हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर आज तिथीनुसार साजरा करण्यात आला. या सोहळ्याला राज्यातील अनेक बड्या नेत्यांसह शिवप्रेमींनी हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवप्रेमींना संबोधित करताना काही मोठ्या घोषणाही केली.



रायगडावरील आयोजित राज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलण्याची संधी न दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे हे नाराज झाले. याच नाराजीतून त्यांनी तडकाफडकी रायगडावरून निघून जाण्याचा निर्णय घेतला.



दरम्यान, यानंतर खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आपली खदखद बोलूनही दाखवली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा राज्य सरकारच्या वतीने होत असताना मी एक शिवप्रेमी आणि नागरिक म्हणून सहभागी झालो. सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न झाला. पण यावेळी राजशिष्टचाराचे नियम पाळले नाहीत. नियम पायदळी तुडवले. त्यामुळे मी इथून जाण्याचा निर्णय घेतला, असं तटकरे यांनी म्हटलं आहे.



मला बोलून देतील असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. राजशिष्टचाराचे नियम पाळले नाहीत. नियोजनांमध्ये अभाव होता. राज्य सरकारचा कार्यक्रम होता, पण काही जण आपण स्वतःहून कार्यक्रम करत आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न करत होते. असं म्हणत खासदार सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

या प्रकारावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे. त्या म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रायगड लोकसभेचे खासदार सुनिलजी तटकरे यांना बोलू दिले नाही. या भागाचे खासदार म्हणून त्यांना यथोचित प्रोटोकॉल आणि सन्मान देणे ही शासनाची जबाबदारी आहे. परंतु शासनाने या कार्यक्रमाला राजकीय कार्यक्रमाचे स्वरूप दिले हे अतिशय खेदजनक आहे. झाल्या प्रकाराचा निषेध.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.