Magnus-Carlsen-chess-champion

बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय बुद्धिबळपट्टू रमेशबाबू प्रज्ञानानंदाला (Pragnananda)जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाने प्रज्ञानांनंदाचे जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगले आहे. टायब्रेकमध्ये पहिल्याच गेममध्ये प्रज्ञानानंदाला पराभवाचा सामना करावा लागला.



कार्लसनने पुढचा गेम ड्रॉ करून सामना जिंकला. अंतिम फेरीत दोन दिवसांत दोन सामने खेळले गेले जे अनिर्णित राहिले. यानंतर टायब्रेकरमधून स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला येथे मॅग्नस कार्लसनने जगज्जेते होण्याचा मान मिळविला.



18 वर्षांच्या प्रज्ञानंदला या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मॅग्नस कार्लसनकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे. पण तो ही वर्ल्डकप फायनल गाठणारा सर्वांत तरूण बुद्धिबळपटू ठरला.

प्रज्ञानानंदा रमेशबाबू याचा जन्म 2005 मध्ये तामिळनाडूच्या चेन्नईत झाला. त्याचे वडिल रमेशबाबू हे बॅंक कर्मचारी आणि आई नागलक्ष्मी गृहीणी आहे. मात्र वडिल पोलिओग्रस्त असल्याने घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यात त्याची मोठी बहिण वैशाली ही देखील बुद्धिबळपटू असून दोन वेळा युवा बुद्धिबळ चॅम्पियन आहे. त्यामुळे रमेशबाबूंना आपल्या मुलाने बुद्धिबळपटू होऊ नये असं वाटत होतं. कारण कुटुंबाला या दोघांचा खर्च परवडत नव्हता. मात्र बुद्धीबळाचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं अन् बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत तो बुद्धीबळ खेळायला लागला.



त्यानंतर वडिलांनी कर्ज काढून त्याच्या या मुलांच्या खेळाला त्यांच्य करिअर बनवण्यासाठी पैसा उभा केला. रमेशबाबूंनी त्यांना मार्गदर्शनही केलं. मुलं विविध स्तरावर स्पर्धांमध्ये खेळू लागली. जिंकू लागले. त्यांच्या घरात सगळीकडे मुलांनी जिंकलेले कप आणि पदकं आहेत. वयाच्या 5 व्या वर्षापासून त्याने हा खेळ खेळायला सुरूवात केली. बुद्धीबळाची आवड वाढत गेली आणि प्रज्ञानानंदा दिवसातून 4-5 तास सराव करायला लागला. आणि दहाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय मास्टरही झाला होता.

बुद्धीबळातील ग्रँडमास्टर म्हणजे पीएचडी मिळवण्यासारखं आहे. लहान वयात ती मिळवणं सोपंही नाही. बुद्धिबळ खेळात दोन प्रकारच्या स्पर्धा असतात. खुल्या जिथे कुणीही पैसे भरून खेळू शकतं. तर काही निमंत्रितांच्या जिथे रेटिंग महत्त्वाचं ठरतं. तर क्रिकेट प्रमाणेच बुद्धिबळातही सुरुवात, खेळाचा मध्य आणि शेवट असे तीन भाग असतात. जर सुरुवातीला तुमचा खेळावर ताबा असेल तर शेवटही तुम्ही चांगला करता. याचं तत्वावर प्रज्ञानानंद इथवर पोहचला आहे.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.