grampanchayat election maharashtra raigad

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजले आहे. रायगड जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 99 सदस्यपदाच्या; तर 10 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींची, तर 3 हजार 80 ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यपदाच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम कार्यक्रम मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी जाहीर केला आहे.



संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.यामध्ये अलिबाग तालुक्यातील 15, मुरुड 15, पेण 11, पनवेल 17, उरण 3, कर्जत 7, खालापूर 22, रोहा 12, सुधागड 13, माणगाव 26, तळा 6, महाड 21, पोलापुर 22, श्रीवर्धन 8 आणि म्हसळा 12 असा समावेश आहे.नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दाखल करता येणार आहेत. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.



निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 16 ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 ते 3 या वेळेत अर्ज दाखल करणे, 23 ऑक्टोबरला दाखल अर्जाची छाननी तर 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असणार आहे. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. निवडणूक 5 नोव्हेंबरला घेण्यात येणार असून, 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.