raigad collector dr mhase

देशभरात अंमली पदार्थांचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला (Illicit drug trafficking) प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने होणार्‍या अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी रायगड जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे करण्याकरीता औषधे विक्रेते यांनी दुकानात सीसीटिव्ही कॅमेरे लावणे आता अनिवार्य करण्यात आले आहेत. जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई करुन प्रभावीपणे परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी तसे आदेश दिले आहेत.



कॉलेज, शाळकरी मुलांमधील अंमली पदार्थाचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी सर्व औषध विक्री दुकानांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आल्याची पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्हा हद्दीतील सर्व औषधे विक्रेते दुकानदारांना सदर आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. सदर आदेशानुसार विक्री करणारे विक्रेते यांनी एक महिन्याच्या आत त्यांच्या दुकानांमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे दर्शनी भागात लावणे अनिवार्य आहे.



मानसिक विकारासाठी दिली जाणारे औषधे समाजात व्यसनासाठी वापरली जात असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे अशी औषधं वैद्यकीय सल्ल्याशिवाय कुणीही विकत नाही. त्यासंदर्भात नोंदी ठेवल्या जात असल्यातरी अशा औषधांची विक्री होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी यांनी क्लोज सर्किट कॅमेरे बंधनकारक केले आहेत.



जिल्हा औषध नियंत्रण विभाग, सी.डब्ल्यू.पी.ओ. विभागाने जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व औषध विक्रेते दुकानदारांना सीसीटिव्ही कॅमेरे लावणेत आले अगर नाही याबाबत पडताळणी करण्यात यावी असे निर्देश दिले आहेत. आदेश निर्गमित केलेल्या दिनांकापासून सर्व औषध विक्रेते दुकानदार यांनी एक महिन्याच्या आत सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत. जर मेडिकल, फॉर्मसी दुकानदार यांनी सीसीटिव्ही कॅमेरा लावणेंत आलेला नाही,असे आढळून आल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सदर आदेशाद्वारे निर्गमित केले आहे.



राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग, नवी दिल्ली यांनी एक युद्ध नशे विरुद्ध व नशा मुक्त भारत या विषयाबाबत एकत्र कृती आराखडा तयार केला असून जिल्हानिहाय माहिती तातडीने देण्याबाबत सूचना केल्या होत्या, या अनुषंगाने सदर आदेश देण्यात आले आहेत.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.