Skip to content
रोज रोज छळतय यशोदे तुझं गं पोर गं,
त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर गं ||
घागर घेऊन पाण्याशी जाता,
आडवा कान्हा वाटेत होता,
चावट हाय लई यशोदे तुझं गं पोर गं ||१||
दही दूध घेऊन मथुरेशी जाता,
आडवा कान्हा वाटेत होता,
हास चावट हाय लई यशोदे तुझं गं पोर गं ||२||
एका जनार्दनी गवळण राधा,
राधा लागली कृष्णाच्या नादा,
राधा लागली हरीच्या नादा,
चावट हाय लई यशोदे तुझं गं पोर गं ||३||
error: Content is protected !! Unable to Copy or Paste