Ramdas boat raigad

आजच्या दिवशीच म्हणजे १७ जुलै १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य व्हायच्या एक महिना आधी गटारी अमावस्येला एका मोठ्या आलेल्या समुद्राच्या लाटेत बोट बुडून तब्बल ६९० जणांचा मृत्यू झाला होता.

रामदास बोट Indian Cooperative Steam Navigation Company च्या मालकीची होती आणि त्या बोटीची भाऊचा धक्का ते रेवस बंदर पॅसेंजर फेरी असायची.

गटारी अमावस्या आणि सुट्टीचा दिवस असल्याने बरीचशी मंडळी घरी आणि पाहुण्यांकडे रायगड आणि कोंकणात निघाली होती. कामगार आणि खलाशांसहित एकूण ७५० लोक बोटींमधून निघाले होते. साधारण सकाळी ७:३५ च्या दरम्यान बोट मुंबई भाऊचा धक्कावरून निघाली होती.

बोट निघून अर्धा तास झाला असेल, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सोसाट्याचा वारा आणि समुद्राच्या जोरदार लाटा उसळत होत्या. सकाळी ८:०५ च्या सुमारास जोरदार लाटांनी बोट एका बाजूला उलटली आणि अजून एक एक मोठी लाट येऊन बोट अचानक गायबच झाली. संध्याकाळ होत आली होती परंतु हाकेच्या अंतरावरती असणाऱ्या मुंबईत रामदास बोट बुडाली हि बातमी अजूनही पोहोचली नव्हती.

त्यावेळी लाईफ जॅकेटच्या साहाय्याने अलिबाग येथील राहणारे बारकू शेठ पोहत मुंबई किनाऱ्यावरती पोहोचले आणि रामदास बोट बुडाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य या बोटीतून प्रवास करत होते ती लोक डोळ्यात पाणी येऊन मुंबईच्या किनाऱ्यावरती आपल्या लोकांची वाट पाहत थांबले होते.

बातमी समजल्यावरती आपल्या कोळी बांधवांनी क्षणाचा विलंब न करता ज्या ठिकाणी बोट पलटली होती तिथे जाऊन जेवढ्या लोकांना वाचवता येईल याकडे लक्ष दिले. त्यासाठी त्यांनी बोटीमधील मच्छी समुद्रात फेकून दिली आणि ७५ लोकांना वाचवण्यात यश आले.

परंतु विलंब झाल्यामुळे आपल्या ६९० बांधवांना जलसमाधी मिळाली त्यात बऱ्याच जणांचे मृतदेहदेखील मिळाले नाहीत. स्वातंत्र्याच्या तोंडावर मुंबईकर आणि रायगडवासीयांना एवढा मोठा धक्का होता कि काही लोक महिना झाला तरी किनाऱ्यावर जाऊन आपले लोक परत येतील अशी आस लावून बसले होते.

रामदास बोट असे नामांतर का झाले?

स्वदेशी चळवळ चालू होती आणि Indian Cooperative Steam Navigation Company स्थापन झाली. त्यावेळी महापुरुष आणि संतांची नावे देण्याचा जास्त विचार होत असायचा म्हणून या बोटीला ‘रामदास बोट’ असे नाव पडले. बोट बुडाली तेव्हा त्यात नुकतेच आषाढी वारी करून आलेले वारकरीसुद्धा होते ज्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.

सावित्री नदीवरील पूल

“हल्लीच ३ ऑगस्ट २०१६ रोजी महाड येथील सावित्री नदीवरील पूल रात्रीचा कोसळून २४ जणांचा वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे ती रात्रसुद्धा अमावास्येची होती.

इतकी वर्षे झाल्यानंतर पावसाळ्यात फेरी सेवा बंद असते आणि बोटींमध्येसुद्धा काळाप्रमाणे बदल करण्यात आला आहे. हल्लीच महाविकासआघाडी सरकारने मुंबई ते अलिबाग रोरो सेवामार्फत अद्यावत बोट चालू करण्यात आली आहे.

रोरो सेवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.