dr babasaheb ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपण अनेक गोष्टी जाणतो. बाबासाहेब आंबेडकर हे एक अर्थशास्त्रज्ञ, उच्चशिक्षित राजकारणी आणि समाजसुधारक होते आणि त्यांना ‘भारतीय संविधानाचे जनक’ म्हणूनही ओळखले जाते. अशीच एक घटना ज्यामध्ये 1942 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या 7 व्या सत्रात भारतातील कामाचे तास 14 वरून 8 तास केले.



त्यावेळेस भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक – भांडवलदार वर्ग हे दुर्बल तसेच असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित असे. कामगार संघटना असून सुद्धा मालकधार्जिन्या त्यामुळे कामगारांचे अस्तित्व असून नसल्यासारखे झाले होते. कामगारांना वाट्टेल तसे राबवून घेतले जाई परंतु मोबदला मात्र खूप अल्प प्रमाणात दिला जायचा. शोषित, कष्टकरी, कामगार वर्ग मात्र गुलामीचे जीवन कंठत होते.



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती, जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानी राहिले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणातुन मुक्तता होईल, अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते.

त्यांनी १५ ऑगस्ट १९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली, ते स्वतः अध्यक्ष होते. पक्षाचा जाहीरनामा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी दैनिकात पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला होता. तथाकथित समाजव्यवस्थेचा बुरखा फाडून स्वतंत्र मजूर पक्षाला नवा चेहरा कसा देता येईल? पक्ष मजबूत कसा होईल? कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य कसे दिले जाईल? असा दूरदर्शी आणि पारदर्शी विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनात घोळत होता.



‘परावलंबी असण्यापेक्षा स्वावलंबी व्हा’ असा संदेश डॉ. आंबेडकरांनी दिला होता. १५ सप्टेंबर १९३८ च्या ट्रेड डिस्प्युट बिलाच्या संदर्भात कौन्सिलमध्ये डॉ. आंबेडकरांनी कामगाराचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला. डॉ. आंबेडकरांच्या मताशी सहमती दर्शवून जमनादास मेथाने डिस्प्युट बिलाचा विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर १९३८ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्धार केला होता.



हा संप अयशस्वी व्हावा यासाठी गिरणी मालकाने पोलिस बळाचा वापर केला. त्यात ७२ कामगार जखमी झाले. ३५ कामगारांना अटक झाली, पण संप यशस्वी झाला. कामगार संघटनांचा विजय झाला. स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला. या कामगारांच्या लढ्यामुळे मालक, भांडवलदार वर्गात प्रचंड खळबळ माजली होती.



भारतीय खाणीमध्ये भारतातील कामगारांना काम करण्यासाठी फारशी संधी दिली जात नसे. इंग्लंडमधून कामगार आयात केले जात. डॉ. आंबेडकरांनी या आयातीवर प्रतिबंध लावला. भारतातील कामगारांना खाणीमध्ये कामावर घेतले जाऊ लागले. अस्पृश्यांना डावलले जायचे. डॉ. आंबेडकरांच्या कायद्यामुळे त्यांनाही खाणीत काम करता येऊ लागले.

भारतातील कामगार आणि कामगार चळवळ, कामगार कायदे, स्त्री कामगाराबद्दलची आत्मीयता, त्यांच्या कौटुबिक संसाराविषयीची चिंता, त्यांच्या जीवनाच्या समृद्धीचा मार्ग केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळेच सुकर झाला असे म्हणता येईल. भारताच्या राजकीय क्षित‌िजावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते तर दलित-शोषित, पीडित , कामगारांचे भवितव्य अंधकारमय झाले असते.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.