aapla bazar marathi

हल्लीचा कोरोनाचा काळ आणि देशभर आर्थिक मंदीची झळ लागली असून बऱ्याच जणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, बेरोजगारी वाढली आहे. परंतु सांगली जिल्ह्यातील देवर्डे या गावातील तरुणांनी ८० पेक्षा जास्त आपला बझारच्या शाखा चालू केल्या आहेत.

आपला बझारवाल्यांचे गाव:

१०००-१२०० लोकसंख्या असलेल्या गावातील १०० तरुण आपला बाजारचे मालक असून ७०० पेक्षा अधिक गावातील लोकांना यामार्फत रोजगार उपलब्ध झाला आहे. आपला बझार वाल्यांचे देवर्डे गाव अशी या गावाची ओळखच झाली आहे.

गावातील दिनकर नायकवडी हे वारणा बझारमध्ये सेल्समन म्हणून कामाला होते, पुढे त्यांनी सातारा आणि रायगड जिल्ह्यात मॅनेजर म्हणून नोकरी केली आणि सर्व बारकावे शिकून घेतले. शिराळ्यातील आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिनकर यांच्या मदतीने आपला बाजार नावाने सुपरमार्केट सुरु केले आणि त्याला नावारूपास दिनकर यांनीआणले.

पुढे दिनकरनायकवडी यांनी गावातील तरुणांना फायदा व बारकावे समजावून सांगून भागीदारीत इतर शाखा सुरु केल्या. सांगली, कोल्हापूर, कोंकण, रायगड, नाशिक, सातारा, नगर अगदी कर्नाटकमध्ये आपला बझार सुरु केला आणि आपल्या अनुभवातून त्यांनी गावातील इतर तरुणांना मार्गदर्शन करून यशस्वी उद्योजक बनविले.

एकप्रकारे या गावातील तरुणांनी मराठी लोक चांगल्याप्रकारे उद्योग करू शकतात याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. याचा आदर्श घेऊन या देवर्डे गावाच्या शेजारील गावातील तरुणांनीही या क्षेत्रात उतरून आपली समृद्धी करून घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.