shivnag-roots-fact-check

सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत असून त्यात हलणारी झाडांची मुळे हि शिवनाग वृक्षाची असून १५ ते २० दिवस सुकायला जातात.

परंतु आम्ही सत्यता पडताळली असता हा विडिओ हॉर्सहेअर अळ्यांचा असून चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला आहे.

सोशल मीडियावरती अशाप्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. शिवनाग वृक्षाची मुळे आहेत. तोडल्यानंतर ही मुळ सुकायला 10 ते15 दिवस लागतात. तोपर्यंत अशीच वळवळत रहातात. परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि शिवनाग प्रकारची कोणतीच वनस्पती अस्तित्वात नाही.

संपूर्ण माहिती घेतल्यानंतर समजले कि हा व्हिडिओ हॉर्सहेअर अळ्यांचाआहे. घोड्यांच्या केसांप्रमाणे या बारीक आळ्या कीटक, झुरळ यांच्या शरीरात प्रवेश करून आतील शरीर पोखरून आपली भूक भागवत असतात. तसेच त्या कीटकांच्या मेंदूवर ताबा मिळवून त्यांना पाण्यापाशी आणून शरीरातून बाहेर पडतात.


पहा या अळ्यांचा माहितीपट.

त्यामुळे शिवनाग वृक्षाच्या मुळांचा हा व्हिडिओ नसून आपण त्यावर विश्वास ठेवू नये.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.