Social media trends

काही तासांतच फेसबुकवरती Coulple Challenge ट्रेंड जोरात चालत असून आतापर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त कपल्सनी या ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आहे. पती-पत्नी व रिलेशनमध्ये असणाऱ्या जोडप्यांनी या ट्रेंडमध्ये उस्फुर्त सहभाग दर्शविला आहे परंतु हे कितपत चांगले किंवा वाईट ठरू शकते पाहूया.

कोरोना व लॉकडाऊन काळात असंख्य चॅलेंज येत होते. हल्लीच महिलांनी साडी व नाथ घालून फोटो शेअर करून नथीचा नखरा ट्रेंडसुद्धा डोक्यावर घेतला होता. आता अचानक कपल चॅलेंजने मुसंडी मारली आहे. यात राजकीय कपल्ससुद्धा सहभागी झाले आहेत.

जे कपल नाहीत त्यांनी मग सिंगल चालेंज सुरु करून इतर mother, बाप-लेक असे ट्रेंड्स सुरु केले आहेत. काही विनोदी अनुषंगानेसुद्धा कमेंट व फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.

परंतु यात सुज्ञ व जाणकार लोकांनी आपले खाजगी आयुष्य पब्लिक करू नये असे मत मांडले आहे. कळत-नकळत आपण येणाऱ्या ट्रेंडच्या ओघात पर्सनल गोष्टी शेअर करत असतो. परंतु हे ट्रेंड कोणी सुरु केले, ते अधिकृत आहेत कि नाहीत याची कोणतीही शहानिशा न करता आपण प्रतिसाद देत असतो.

मार्केटिंग एजंसी व ऍडव्हर्टायझिंग कंपन्या असे ट्रेंड बनवून आपल्याला त्या प्रवाहात खेचत असतात. एकच हॅशटॅग जास्त प्रमाणात ट्रेंड होत असेल तर त्या हॅशटॅगला क्लिक केले तरी ज्यांनी यात सहभाग घेतला आहे त्यांची माहिती त्वरित उपलब्ध होते. यात तो कोणत्या प्रकारचा ट्रेंड आहे त्यावरून मार्केटिंग कंपन्या काम करत असतात आणि डेटा गोळा करत असतात. त्याचा विविध गोष्टींसाठीसुद्धा दुरुपयोग आपल्या संमतीशिवाय केला जाऊ शकतो.

आपले ऍड असलेले मित्र-परिवार आपल्या परिचयाचे असतात त्यामुळे त्यांना दिसेल याच सीमारेषेखाली आपण पर्सनल गोष्टी शेअर करून लाईक व वाहवा मिळवू शकतो ज्याचा धोका कमी असतो किंवा प्रोफाईल private असल्यास धोका नसतो.

मुळात आपण आपल्या खाजगी गोष्टी, फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करून आपल्याला कोणताही पुरस्कार मिळत नसतो परंतु आपली privacy धोक्यात आणत असतो. ज्यांना privacy महत्वाची आहे त्यांनी अशा ट्रेंडमध्ये सहभागी होणे टाळावेच.

मुख्यत्वे कोणताही ट्रेंड असला तरी महिलांनी जास्त काळजी घेणे गरजेचे आहे किंबहुना अशा पब्लिक ट्रेंडमध्ये सहभागी होणे टाळावेच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.