rohit pawar helps accidental van

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता अपघातग्रस्त गाडीला स्वतः धक्का देऊन बाहेर काढले व शेतकऱ्याला मदत केल्यामुळे त्यांचे सोशल मीडियावरती कौतुक होत आहे.

सांगलीतील माण तालुक्यात मांडवे-पिंगळी दरम्यान रोहित पवार जात असताना एका लोखंडी ग्रीलवर ओमनी व्हॅन आदळली होती. क्षणाचाही विलंब न करता रोहित पवार यांनी गाडीतून उतरून खाली गेलेल्या व्हॅनला बाहेर काढले.

तसेच अपघातग्रस्त असलेल्या शेतकऱ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.

रोहित पवारांनी आवाहनही केले आहे कि, पोलिस चौकशीला घाबरुन अनेकदा लोक अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत आणि त्यामुळं वेळीच मदत न मिळाल्याने अपघातातील जखमींचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे कोणतीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना तातडीने मदत करा आणि पोलिसांनाही विनंतीकेली, अशा लोकांना चौकशीसाठी त्रास देऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.