mns-warned-state-government

राज्य सरकारने वीजबिल माफी देता येणार नाही हे स्पष्ट केल्यानंतर वीजबिल मुद्द्यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारने वीजबिल माफी संदर्भात राज्यातील साडे आकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे.

तसेच जनमाणसात आता संतापाची लाट उसळली असून सोमवारपर्यंत वीजबिल माफ करा अन्यथा जिल्हा-जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून या बैठकीत वाढीव वीजबिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुकतेच राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती व त्यांच्या सांगण्यावरून शरद पवार यांच्याशी बोलणे करून निवेदनही देण्यात आले होते.

परंतु वीजबिल माफ होणार नाही हे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले असून याविरोधात मनसेने सोमवार २३ नोव्हेंबर २०२० पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे अन्यथा मानसे आंदोलन करणार अशी घोषणा बाळा नांदगांवकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.