mejor kanika rane

ऑगस्ट २०१८ मध्ये मेजर कौस्तुभ राणे काश्मीरमधील गुरेझ भागात दहशतवाद्यांसोबत लढताना शहिद झाले होते. त्यावेळेस त्यांच्या पत्नी कनिका या मुंबईत नोकरी करत होत्या. त्यानंतर त्यांनी ठरवलेच कि आपणही आपल्या पतीप्रमाणे देशसेवेचा वसा हाती घ्यायचाच.

सरकारी नोकरी मिळत असतानादेखील त्यांनी लष्करात जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. परीक्षा तसेच मुलाखतीत त्या अग्रेसर येत होत्या त्यामुळे २०१९ अवघ्या एका वर्षातच त्यांची प्रशिक्षणासाठी निवड झाली.


मुलगा लहान असताना देखील त्यांनी चेन्नई येथे जाऊन ९ महिन्यांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण करून त्या आता लष्करात अधिकारी झाल्या आहेत.

त्यांच्या गणवेशावरती आता लेफ्टनंद पदाचे २ स्टार मिळाले आहेत. त्यांच्या या धाडसी वृत्तीला आणि जिद्दीला सलाम.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.