shivsena beats ncp

२३ नोव्हेंबर २०२० । माणगांव तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत तळाशेत येथे फेरनिवडणुकीत अवघ्या एक मताने शिवसेनेचा सरपंच निवडून आला आहे. शिवसेनेच्या रोशनी राजेंद्र नवगणे या आता सरपंचपदावर विराजमान झाल्या आहेत.

मागील वर्षी राष्ट्रवादीचे स्व. दिनेश महाजन हे जनतेतून थेट सरपंचपदी निवडून आले होते परंतु ९ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई येथील जसलोक रुग्णालयात त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे सरपंचपद रिक्त झाले होते.

रिक्त सरपंचपदासाठी आज २३ नोव्हेंबर रोजी शासनाच्या नवीन निकषानुसार ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचपदाची निवडणूक अधिकारी एम. डी. पालांडे यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली.

सरपंचपदाच्या या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून रोशनी राजेंद्र नवगणे तर राष्ट्रवादी पक्षातर्फे स्व. दिनेश महाजन यांच्या पत्नी दिप्ती दिनेश महाजन यांनी अर्ज दाखल केला होता. एकूण १५ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ८ मते रोशनी राजेंद्र नवगणे यांना मिळून एका मताने त्यांचा सरपंचपदासाठी विजय झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.