mla pratap sarnaik

शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर आज २४ नोव्हेंबर २०२० ईडी ने छापे टाकले. तसेच त्यांचे पुत्र पूर्वेश आणि विहंग सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई केली आहे.

ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी बांधकाम व निवासी संकुलाच्या संबंधित छापे मारले असून विविध प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.

प्रताप सरनाईक कोण आहेत:


प्रताप सरनाईक ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातील आमदार आहेत. राजकारणात ते आले तेव्हा राष्ट्रवादी पक्षात काम करत होते आणि २००८ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००९ साली त्यांना विधानसभेचे तिकीट मिळाले आणि सलग ३ वेळा ते शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून येत आहेत.

प्रताप सरनाईक यांचा व्यवसाय काय आहे:


प्रताप सरनाईक यांचा रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यवसाय असून विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे ते अध्यक्ष आहेत. ठाण्यातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये विहंग ग्रुप सहभागी आहे. विहंग इन हे थ्री स्टार हॉटेल देखील विहंग ग्रुपच्या मालकीचे आहे.

अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव प्रताप सरनाईक यांनी मांडल्यामुळे ही कारवाई केली जात आहे असं वाटतंय का? असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी भाजप पक्षाला विचारला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.