epass maharashtra

गणेश उत्सव काही दिवसांवरच आला आहे. गणेशउत्सवाकरिता मुंबई- पुण्याहून लाखो चाकरमानी दरवर्षी कोंकणात येत असतात. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने कोंकणात जाण्यासाठी धोरणे ठरविलेली आहेत.

सोशल मीडियावरती अफवा पसरली आहे कि शासनाने ई-पास रद्द केला आहे परंतु हि बातमी खोटी आहे. एस. टी. वगळता इतर सर्व वाहनांना ई-पास सक्तीचा आहे.

अन्य प्रकारच्या सर्व खाजगी वाहनांना ई-पास बंधनकारक असून १० दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. रायगड जिल्ह्याची हद्द संपताच कशेडी घाटात तपासणी होऊन एसटीने येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासची गरज नसेल परंतु बाकी सर्व वाहनांना ई-पास असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.

कोंकणात गणेश उत्सव हा इतर सणांपेक्षाही जास्त प्रमाणात साजरा केला जातो आणि उत्सवाकरिता कोंकणी माणूस जवळपास २-३ महिने आधीच सर्व तयारी करत असतो. परंतु यावर्षी कोरोनाचे महासंकट गेले काही महिने जगभर थैमान घालत असून अनेक जणांना यात प्राण गमवावे लागले आहेत. सरकारी यंत्रणा व मेडिकल विभागवरती कमालीचा ताण आला असून ऐन गणेश उत्सवात अजून प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने काही धोरणे ठरविले आहेत.

आधी १४ दिवस असलेला क्वारंटाईन आता १० दिवसाचा करण्यात आला आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन त्यात त्यांनी खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना ई-पास अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यात त्यांनी असे नमूद केले आहे कि फक्त ५ ते १२ ऑगस्ट २०२० दरम्यान कोकणात गणेशोत्सवासाठी जाताना ई-पास ची गरज नाही परंतु १२ ऑगस्ट नंतर स्वॅब टेस्ट करणे बंधनकारक राहणार आहे.

होम क्वारंटाईन १० दिवस असून घराबाहेर पडणे अनिर्वाय असून कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमात सहभाग होऊ शकत नाही. येत्या २२ ऑगस्टला गणेश उत्सव सुरु होत असून त्याच्या १० दिवस आधी म्हणजेच १२ ऑगस्टच्या आधी कोंकणात आल्यास विसर्जन आणि आरतीत सहभाग घेता येऊ शकेल.

एस. टी. ग्रुप बुकिंग कशा रीतीने होणार आहे:

ST bus reservation

  • ५ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट पर्यंत जाता येईल, ई-पास ची गरज नाही. परतीचा प्रवास २३ ऑगस्ट पासून. प्रवासात प्रत्येकाला मास्क बंधनकारक. आगाऊ आरक्षण http://msrtc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध.
  • बसेस मध्ये कोणत्याही स्थानकावर थांबणार नसल्याने मधल्या स्थानकांची नावे आरक्षणामध्ये नमूद केल्यास, ती बस आपणास आरक्षणासाठी उपलब्ध होणार नाही. अर्थात, तालुका व जिल्ह्याच्या मुख्य स्थानकातून स्थानिक एसटी बसेस द्वारे आपण आपल्या इच्छित गावी जाऊ शकतात.
  • कोकणात जाण्यासाठी एसटी बसचे आगाऊ आरक्षण करताना कृपया, प्रवाशांनी कोकणातील प्रमुख जिल्हा अथवा तालुक्याचे गाव निवडावे.उदा. रत्नागिरी, मालवण, चिपळून ,खेड, गुहागर .यानुसार एसटी बसेस आरक्षणासाठी उपलब्ध केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.