natu natu oscars

95 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. RRR या चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

‘नाटू’ शब्दाचा अर्थ हा अस्सल देशी असा आहे. इथल्या मातीच्या सुगंधाची अभिव्यक्ती आहे. या गाण्यातील प्रत्येक शब्द त्या गोष्टीशी नातं सांगतो, ज्या गोष्टींना इथल्या मातीचा गंध आहे.

भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेलं हे पहिलं गाण आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

याआधी स्लमडॉग मिलेनिअरच्या वेळी अशी चर्चा झाली होती. तेव्हा जय हो गाण्याला हा पुरस्कार मिळाला होता. तो चित्रपट पूर्णपणे भारतीय नव्हता. त्याच्या चित्रपटाचं दिग्दर्शन डॅनी बॉयलने केलं होतं.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.