aadhar and pan card link otp

आपल्याला बँकेत खातं उघडायचं असेल तसेच जवळ जवळ सगळ्याच आर्थिक व्यवहारांसाठी पॅन क्रमांक लागतो. पॅनकार्डच्या मदतीने आयकर विभागही तुम्ही करत असलेल्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवत असतो.

मोठे गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारला याचा उपयोग होतो. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ही केंद्रसरकारची एक संस्था आहे. ते आपल्याला आधार ओळखपत्र देतात. हा एक बारा आकडी क्रमांक आहे जो प्रत्येक नागरिकासाठी वेगळा आहे. नागरिकाचे नाव, जन्मदिवस, वय, लिंग, पत्ता आणि बरोबरीने तुमच्या बोटाचे ठसे तसेच डोळ्यांचं बायोमेट्रिक स्कॅन घेऊन तुम्हाला आधार क्रमांक मिळतो.

पॅन कार्ड आधारशी का जोडायचं आहे?



सध्या 50 हजारांच्या पुढच्या आर्थिक व्यवहारांसाठीही पॅन कार्ड अनिवार्य आहे. ठरलेल्या मुदतीत तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला नाही जोडलंत तर तुमचं पॅन कार्ड रद्द होईल. तसेच आयकर कायदा 272-B नुसार तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे पॅनकार्ड नसेल तर तुम्ही जवळ जवळ कुठलेच मोठे आर्थिक व्यवहार करू शकणार नाही.



आधार व पॅन जोडलेले आहेत की नाही कसं ओळखायचं?

पॅन आणि आधार एकमकेांशी जोडलेले आहेत का हे तपासण्यासाठी आयकर विभागाच्या साईटवर जाऊन पॅनकार्ड व आधार नंबर टाकून ‘View link Aadhaar status’ वर क्लिक करावे. त्यावेळेस आपल्याला कळेल आपले पॅन व आधार कार्ड लिंक आहे कि नाही.

https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/link-aadhaar-status

Image: View link Aadhaar status


आधार आणि पॅनकार्ड ऑनलाइन जोडण्यासाठी काय कराल?

आयकर विभागाच्या https://www.incometax.gov.in/iec/foportal/ संकेतस्थळावर गेल्यावर क्विक लिंक्स विभागात लिंक आधारवर क्लिक करावे, तिथं एक फॉर्म दिसेल, त्यात आधार आणि पॅन नंबर टाकावा.


  • तेथे Continue to Pay Through e-Pay Tax वर क्लिक करा.
  • तेथे पॅन नंबर टाकून कन्फर्म करा, त्याचा तुम्हाला ओटीपी येईल.
  • ओटीपी व्हेरिफाय केल्यावर तुम्ही e-Pay Tax page वर जाल.
  • तेथे प्रोसिड बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर Assessment Year 2023-24 निवडून पेमेंटसाठी “Other Receipts” निवडा.
  • पैसे भरल्यावर पुन्हा एकदा इ फायलिंग पोर्टल वर जा.
  • तेथे तुमचा युजर आयडी, पासवर्ड टाकून आत प्रवेश करा,
  • तेथे लिंक आधार नावाची विंडो पॉपअप होईल. तसं न झाल्यास प्रोफाइल सेटिंग्स मध्ये जाऊन लिंक आधारवर क्लिक करा
  • तिथं तुमचं नाव, जन्मतारीख, लिंग ही माहिती तुमच्या पॅनमधून आपोआप घेतल्याचं दिसेल.
  • आधार आणि पॅनची माहिती जुळत असल्यास “link now” वर क्लिक करा.
  • मग हे दोन्ही जोडल्याचा मेसेज पॉपअप होईल.
  • 31 मार्च 2023 हा आधार आणि पॅन जोडण्याचा शेवटचा दिवस निश्चित करण्यात आला होता.

जर या मुदतीपर्यंत लिंक केलं नाही, तर त्यासाठी 1000 रुपये दंडाची तरतूदही करण्यात आली होती. पण ही मुदत पुन्हा वाढवून देण्यात आली आहे.

आधार-पॅन लिंक करण्याची मुदत आता तीन महिने वाढवून ती 30 जून 2023 पर्यंत करण्यात आली आहे.



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.