raj thackrey

मंत्रालयात जाण्यापॆक्षा कृष्णकुंजकडे जाणे लोक जास्त पसंत करताना दिसत आहेत. सत्ता नसतानाही राज ठाकरेंवरती जास्त विश्वास का लोक दाखवत आहेत. जिम मालकांपासून ते आज मुंबईचे डब्बेवाल्यांपर्यंत सर्वांनी अडचणी दूर करण्यासाठी राज ठाकरेंची प्रथम निवड केली.

पोलिसी कव्हर व कमी मिळणाऱ्या सुविधांसंदर्भात डॉक्टर्सनीसुद्धा राज ठाकरेंचीच भेट घेणे हिताचे मानले.

सामान्य लोकांना भेडसावणाऱ्या समस्या, मूलभूत गरजा तसेच अन्याय दिसेल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ‘खळखट्याक’ सदैव लोकांनी पहिले आहे. त्याचा परिणाम होऊन सुविधा म्हणा किंवा चांगला इफेक्ट दिसत येत असतो.

मनसे पक्ष स्थापन केल्यापासूनच राज ठाकरे यांनी आक्रमकता दाखविली आहे. करारी व ठाकरी बाणा आणि भाषणांची स्टाईल व मुद्देसूद मांडणी यांमुळे राज ठाकरे सदैव चर्चेत राहिले आणि त्यांच्याकडे काम होईलच अशी समाज होऊन लोक कृष्णकुंजची वाट धरत आहेत.

तसेच लोकांना शिवसेनेची मूळ आक्रमकता कालांतराने कमी होताना दिसून आली. इकडे मनसेचा सत्ता नसतानासुद्धा एक दरारा वाढत जात होता आणि जवळपास सर्वच आंदोलने यशस्वी होत गेली. मराठीचा मुद्दा असो फेरीवाले, ट्रेनचा मुद्दा, रोजगार लढा देताना अनेक मनसैनिक व नेते जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास गमावण्यास मनसे एकप्रकारे यशस्वी झाली.

कोणतेही आंदोलन रस्त्यावर उतरून पाठपुरावा करण्याची ताकद राज ठाकरे व कार्यकर्त्यांमध्ये असते तसेच जो मुद्दा आहे आणि त्यात ग्रासलेले लोक आहेत त्यांना हि पद्धत आपलीशी वाटते म्हणून जास्त प्रमाणात लोक राज ठाकरेंची मदत घेतात.

लॉकडाऊनच्या काळात रिक्षावाले, डॉक्टरांचे शिष्टमंडळ, मुंबईचे डब्बेवाले, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न, वीजबिलांचा मुद्दा, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या जिम व मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन आणि हल्लीच सामान्यांना लोकल चालू करावी यासाठीचे आंदोलन व सरकारशी पत्रव्यावहारांद्वारे बोलणी करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.