electricity bill

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवस लॉकडाऊन करण्यात आला होता. लोकांना त्या काळात कामे नसताना घरीच थांबावे लागले.काही जण भाड्याने राहत होते काहींचे स्वतःचे घर असताना प्रत्येकाला भरमसाठ विजेची बिले आल्यानंतर जनभावनांत एकच संताप उडाला.

अनेक लोकांनी आणि सेलिब्रिटींनीसुद्धा या संकटाविरोधात सोशल मीडियावरती नाराजी व्यक्त करून वीजबिलात सुधारणा करून वीज बिल द्यावे अशी मागणी केली होती.

अनेकांचे हातावर पोट असताना काहींनी नोकऱ्याही गमावल्या होत्या अशा लोकांचे मानसिक खच्चीकरण झाले. सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली असताना महाविकासआघाडीच्या १५ मंत्र्यांना वीजबिलात सवलत मिळाल्याची माहितीच्या अधिकारात उघड झाली असून विजेचे बिल का पाठवले नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला. सर्वसामान्यांना नोकऱ्या व आर्थिक टंचाई असताना वाढीव वीजबिले आली आणि मंत्र्यांना ४-५ महिन्यांचे बिलच न देता सवलत देणे म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

कोणकोणत्या मंत्र्यांना वीज बिले आली नाहीत:

लोकनिर्माण विभागातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मार्च ते जुलै महिन्यापर्यंत मंत्र्यांच्या बंगल्यांच्या बिलांची माहिती मिळावी म्हणून मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार १५ मे २०२० पासून ५ मंत्र्यांना ५ महिन्यांचे बिल पाठविले नसून त्यात हसन मुश्रीफ, अमित देशमुख, संजय राठोड, केसी पाडवी आणि दादाजी भुसे यांचा समावेश आहे. तर ४ महिन्यांपासून आदित्य ठाकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, वर्षा गायकवाड, अनिल परब, गुलाबराव पाटील, संदीप भुमरे, बाळासाहेब पाटील या मंत्र्यांना विजेची बिले पाठविण्यात आलेली नाहीत.

balasaheb-thorat-on-electricity-bill

विजेच्या बिलावरून राजकारण तापायला लागले असतानाच हा प्रकार समोर आला आहे. या बाबत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना,तुम्ही वीज कंपन्यांनाच विचारा कि मंत्र्यांना वीज बिले का आली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.