sharad-pawar-cancer-fighter

शरद पवार याना अजूनही ८० वर्षांचा तरुण का म्हणतात यामागे त्यांची लढण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. संघर्ष करणे हा त्यांचा पिंडच जो त्यांनी त्यांच्या आईकडून शिकलेला आहे. आजच्या कोरोनाच्या काळातही ते घरी न थांबता कामांचा वेग अधिक वेगाने चालूच आहे.

जेव्हा शरद पवार यांचे कॅन्सरचे निदान झाले त्यानंतर एकूण ३ ऑपरेशन झाले. डॉक्टर म्हणाले फक्त ६ महिन्यांचे आयुष्य उरलय. पण शरद पवार हार मानतील ते कसले. हि गोष्ट डॉक्टरांनी सांगून झालेल्याला आता १५ वर्षेहोऊन गेलीत आणि शरद पवार एका मागोमाग एक संघर्षमय जीवन जगत त्यांनी इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.

लढण्याचा गुण त्यांनी आईकडून घेतला:

unstoppable-sharad-pawar

गावात एकदा त्यांच्या आईला वळूने जोरात धडक दिली होती त्यात त्यांच्या मांडीच्या हाडाचा चुरा झाला होता. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना आयुष्यभर कुबड्या घेऊनच चालावे लागत असे. परंतु त्यांनी आपल्या आजाराला शरीरावर राज्य गाजवू दिलं नाही उलट नेहमीसारखंच परिवारावर बारीक लक्ष्य देऊन त्यांनी संसार व उर्वरित आयुष्य घालवले, दुखापतीचा बाऊ नाही केला.

कॅन्सरचे निदान आणि वेदनादायी उपचार:

२००४ सालची निवडणूक आणि शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज भरून प्रचार आणि सभा याकडेच लक्ष द्यायचे ठरले होते. डाव्या बाजूच्या आतील बाजूला एक गाठ आली होती म्हणून रिपोर्ट काढण्यात आले.

डॉक्टर रवी बापट आणि डॉ. शरदिनी डहाणूकर या दोघांनीही बायोप्सीचा रिपोर्ट आल्यावर कॅन्सरचे निदान झाले. पुढे डॉ. सुलतान प्रधान यांच्या सल्ल्यानुसार लगेच ऑपेरेशन करणे गरजेचे होते. नंतर प्रचार दौरे ठरलेलेच होते.

ऑपेरेशन करून डाव्या गालाचा संपूर्ण भाग काढण्यात आला. मांडीच्या त्वचेचे तेथे रोपण करण्यात आले. ८ दिवस जबडा मिटायचा पण नव्हता आणि कोणती हालचालही करायची नव्हती त्यासाठी टेनिस बॉलच्या आकाराचा गोळा तोंडात ठेवण्यात आला होता.

प्रचार आटोपल्यानंतर कॅन्सर पसरू नये म्हणून भयानक वेदनादायी केमोथेरपीचे उपचार दिल्ली अपोलो रुग्णालयात सुरु झाले.

सूक्ष्म सुईने आजूबाजूचा आतला भाग जाळला जात असे त्यामुळे ओठ आणि जीभ भाजून निघते. पाणी पितानासुद्धा भूल द्यावी लागत असे. रुमाल रक्ताने भरत असे आणि हे उपचार करण्यासाठी रुग्णालयात रोज जावे लागत असे.

जेव्हा शरीर कमजोर असते तेव्हा खंबीर मन त्या वेदना कमी करत असते. सतत कामाचा विचार आणि विस्तार करत असल्यास वेदनांचा विसर पडत जातो. म्हणून त्यांनी विश्रांती न घेता काम करतच राहिले.

sharad-pawar-with-daughter-supriya-sule

त्यानंतर ३-३ महिन्यांनी उपचारासाठी अमेरिकेत जावं लागत असे. नंतर ६ महिन्यांच्या कालावधीनंतर उपचार करावे लागत असे आणि शेवटी पूर्ण उपचार थांबवून अमेरिकेत न येण्याचे सांगितले.

कॅन्सर का झाला होता:

खुद्द शरद पवार यांनी कॅन्सरग्रस्त लोकांना आपल्या अनुभवातून लढण्यासाठी धीर देताना सांगितले ‘मी पान पराग’ खाल्ल्यामुळे हा गंभीर आजारउद्भवला. परंतु खचून न जाता लढा देऊन मात करू शकतो.

आघाडीचे सरकार असताना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवरसुद्धा बंदी घातली आणि इतरांना न खाण्यास सदैव आग्रहाने सांगू लागले.

हल्लीच काही वर्षांपूर्वी खुर्चीतून पडल्यामुळे मांडीच्या खुब्यातला वॉल क्रॅक झाला तेव्हा डॉक्टरांनी काही महिने चालण्यासाठी काठीचा वापर करावा लागेल असे सांगितले परंतु कॅन्सरला पळवून लावणाऱ्या शरद पवार १५ दिवसांत चालायला लागले आणि काठीही काही दिवसांत सुटली.

या यशाचा काय आहे फॉर्म्युला:

कोणत्याही आजारपणात त्यांनी कार्यालय, मिटिंग, बैठका घेणे सोडले नाही अगदी भयानक वेदना असल्यातरी. राजकारण म्हटले कि संपूर्ण वेळापत्रक ठरलेलं, लोकांच्या भेटीगाठी. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न, दौरे ठरलेले असतात.

हे सगळं करताना शरद पवार यांनी स्वतःला सवयच लावून घेतली. सकाळी लवकर उठून चालण्याचा व्यायाम करणे, सकाळचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण यांच्यामध्ये काही खात नाहीत. जेवणात तिखट आणि तेलकट कमी ठेवून भरपूर पाणी पिण्यावर भर देतात. झोपेवरती पूर्ण नियंत्रण त्यांनी ठेवले असून कमीत कमी झोप त्यांनी शरीराला लावली आहे.

त्यामुळे आपण राजकारण बाजूला ठेवून शरद पवार यांनी कशारितीने कॅन्सरवरती विजय मिळवला आणि इतरांनाही प्रेरणा देण्याचे काम केले हे विसरून चालणार नाही. क्षेत्र कोणतेही असले तरी त्यावरती प्रेम करून निष्ठेने काम करत राहिल्यास बाकी अडचणींचा सामना करायला आपण अपोआपच शिकतो.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.