Jambhulpada

२६ जुलै मुंबईला आलेला महापूर आपण नेहमीच आठवत आलोय परंतु रायगडमधील आलेला आंबा नदीचा महापूर संपूर्ण जांभूळपाड्याला वाहून गेला. २३ जुलैच्या रात्री म्हणजेच २४ जुलै १९८९ रोजी आलेला महापूर आजही त्या आठवणी डोळ्यांत अश्रू आणि काळजात धस्स करून जातात. आज त्या महापुराला ३१ वर्षे पूर्ण झालीत.

“मुसळधार पाऊस पडत होता आणि आंबा नदीला तितकसं पाणी आलं नव्हतं. रात्री अडीचच्या सुमारास क्षणात ८ ते ९ फूट पाणी वाढून कोणाचे घर तर कोणाचे नातेवाईक डोळ्यांदेखत वाहून गेले आणि तब्बल ८४ जणांचा बळी गेला.”

मध्यरात्रीच्या सुमारास जांभुळपाडा गावातील लोक साखरझोपेत होते. रात्री २:३० वाजता क्षणात पाणी वाढत चालले आणि थेट गावकऱ्यांच्या घरात घुसले. त्यामुळे काहीच सुचत नव्हते आणि पाण्याचा प्रवाहाचा वेग प्रचंड आणि काळोख त्यात काहीच सुचत नसल्याने आपल्या समोरच कोणीतरी आपलं वाहून जातंय हे आजसुद्धा आठवलं तरी गावकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो.

कोणाचं घरातलं आपलं माणूस वाहून गेलय, जगले वाचलेत काहीच कल्पना नसताना जेव्हा पूर ओसरला तेव्हा चिखलात, झाडा-झुडपाला अडकलेले अनेकांचे मृतदेह सापडायला लागले. रस्त्यावर गावात सगळीकडे आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. आभाळ फाटणे काय असते हे प्रत्यक्ष गावकऱ्यांनी अनुभवले होते.

जांभुळपाडा येथील स्मृतिस्तंभ

गावातील वाचलेले लोक आणि शेजारील गावातील लोकांनी वेळ न घालवता जे लोक झाडा-झुडपात जिवंत अडकलेले होते त्यांना वाचवू लागले आणि मृतदेहांचा खच साचलेला होता ते सर्व मृतदेह गावातील हायस्कुलमध्ये नेवून ठेवले. नातेवाईकांची ओळख पटवून नंतर मग त्यांच्यावर जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

आज ३० वर्षांपेक्षा अधिक काळ या घटनेला होऊन गेला असून नियमितपणे अगदी कोरोनाच्या संकटातही गावाचे प्रथम नागरिक सरपंच, ग्रामस्थ, पोलीस, प्रशासन आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या नातेवाईकांना श्रद्धांजली वाहिली जाते.

“आंबा नदी जांभुळपाडा, पाली, नागोठणे करत रेवसनजीक अरबी समुद्राला मिळते. परंतु दरवर्षी मुसळधार पाऊस पडला कि पालीचा रस्त्यावरील पूल, आजुबाजीची गावे आणि नागोठणे दरवर्षी पुरामध्ये अडकतात. त्यामुळे लोक मुसळधार पाऊस पडला कि रात्र-रात्र जागून काढतात. त्यामुळे नदीचे रुंदीकरण, गाळ उपसा आणि अजून भयंकर घटना घडू नये तसेच प्रशासनाने कायमचा तोडगा काढावा अशी नदीलगतच्या गावकऱ्यांची सततची मागणी असते. सध्या वाकण ते खोपोली रस्त्याचे काम चालू असून जांभुळपाडा येथे उंच व आधीपेक्षा रुंद पूल बांधण्यात आला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.