tanjavur-sambhar

आता तुम्ही म्हणाल दक्षिणेतील लोक इडली, डोसा, उत्तप्पा अगदी भातासोबत पण सांबारच खातात तो पदार्थ चक्क मराठमोळा आहे. होय, हे अगदी खरं आहे. आज सांबार किंवा सांभार जगभरात दाक्षिणात्य पदार्थ म्हणून ओळखला जातो परंतु याचा शोध मराठ्यांच्या राजवटीत स्वतः छत्रपती संभाजी महाराज यांनी लावला आहे.

आज वेगवेगळ्या एकूण ५० प्रकारचे सांबार बनवले जात असले तरी मूळ पाककृती हि महाराष्ट्राचीच आहे.

भोपळा, शेवग्याची शेंग, नारळ, टोमॅटो, सुकी लाल मिरची, वांगे, उडीद डाळ, खोबऱ्याच्या तेलाची फोडणी देऊन हा चविष्ट पदार्थ बनवला जातो.

काय आहे सांबारचा इतिहास:

विविध आहारतज्ञ, शेफ आणि माहितीद्वारे सांबार हा मराठमोळा पदार्थ आहे यात वाद नाही. शहाजी राजांनी कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सीमेवरील तंजावूर या प्रांताची जहागीर मिळवली होती. त्यानंतर ती जहागीरी छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजेंना मिळाली. त्यांच्या नेतृत्वात मराठा साम्राज्य दक्षिण भारतात पसरत गेले.

छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा मराठा साम्राज्याचा झेंडा पूर्ण दक्षिणेत फडकावा असे स्वप्न होते. त्यालाच अनुसरून संभाजी महाराज छत्रपती झाले तेव्हा कर्नाटकची मोहीम आखली. मोहिमेला जाताना तंजावूरच्या गादीवर व्यंकोजीराजांचे पुत्र शाहू महाराज बसले होते. आपला भाऊ मोहिमेवरती येत आहे म्हणून शाहू महाराजांनी शाही मेजवानीचा बेत केला होता.

शाहूंजींना आपल्या हाताने काहीतरी संभाजी राजांना बनवून द्यावे म्हणून ते स्वतः मुदपाक खान्यात गेले. मराठा सरदारांनासुद्धा जेवणात डाळ सदैव लागत असे. जेवणाची सर्व तयारी झाली असताना आमटीसाठी लागणारे आमसूल संपले होते. त्यामुळे शाहूंजींचा पारा चढला होता. पण त्या भागात कोकम आमसूल पिकत नसले तरी चिंच मात्र मिळत होती.

संभाजी महाराजांच्या सल्ल्याने आमसुलाऐवजी चिंच आणि सुकी मिरची घालून मिश्रण तयार करून आमटीसाठी वापरले गेले.

शाही मेजवानीला आलेल्या छत्रपती संभाजी महाराज व इतर सरदारांना हा प्रयोग अतिशय आवडला आणि अशा प्रकारे नवीन पदार्थाचा जन्म झाला. संभाजी महाराजांच्या नावावरून संभाजी सारम नंतर संभारम आणि आता सांबार असे नावात बदल होत गेले.

सांभारचा शुद्ध मराठ्यांनीच लावला याचा पुरावा:

तंजावूर येथे सबेन्द्र पाककला पुस्तक सरस्वती महाल पुस्तकालयात असून त्याच्यात पाककृतींची नोंद केलेली आहे. ‘करीज ऑफ इंडिया कार्यक्रमात भारताचा प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यानेसुद्धा जाहीररीत्या सांगितले होते कि सांबारचा शोध मराठ्यांच्या कालखंडातच लावला गेला आहे. तसेच पुष्पक पंत हे पाकशास्रज्ञ असून त्यांनीसुद्धा मान्य केले आहे कि सांबारचा शोध तंजावूरमध्येच लागला आहे.

त्यामुळे आता आपल्या सदैव खाताना लक्षात राहील कि सांबार हा मराठमोळा पदार्थ आहे.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.