sharad pawar and sanjay ravut interview

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. श्री. शरद पवार यांची मॅरेथॉन अडीच तास मुलाखत घेतली. यात त्यांनी शरद पवार यांना कोरोनापासून आघाडी सरकार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटासह अनेक प्रश्न विचारले. यावर शरद पवार यांनी रोखठोक उत्तरं दिली. यातील शरद पवारांचे महत्वाचे मुद्दे!

‘एकच शरद-सगळे गारद’… सामनाच्या मुलाखतीतील शरद पवारांचे महत्वाचे मुद्दे!

  • शिवसेना नसती तर भाजपला २०१९ विधानसभा निवडणुकीत १०५ जागा न मिळता ४०-५० जागाच मिळाल्या असत्या
  • तिन्ही पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आणि महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी.
  • लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयार्कसारखी भयानक परिस्थिती झाली असती.
  • मी आघाडी सरकारचा हेड मास्टरही नाही आणि रिमोट कंट्रोल देखील नाही. हेडमास्टर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधीही चालत नाही. जिथं लोकशाही नाही तिथंच रिमोट चालतं.
  • सरकार स्थापनेबाबत भाजपशी कधीच चर्चा झाली नाही. फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते. त्यांना काही माहित नाही.
  • लॉकडाऊनच्या काळात खूप गाणी ऐकली. भीमसेन जोशींचे सर्व अभंग ऐकले. हे अभंग दोन-तीन-चार नव्हे तर अनेकदा ऐकले. जुन्या काळात बिनाका गीतमाला असायची. आता ती नव्याने उपलब्ध आहे. त्याही पुन्हा पुन्हा ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळाली. संपूर्ण गीत रामायण पुन्हा ऐकलं. ग दि माडगुळकरांनी देशाच्या विशेषतः महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या सांस्कृतिक विश्वात किती जबरदस्त कलाकृती निर्माण करु ठेवलीय याचा पुन्हा प्रत्यय घेतला.

मुलाखत येथे पहा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.