You are currently viewing नवरात्री देवीची आरती (Navratri Devichi Aarti)

नवरात्री देवीची आरती (Navratri Devichi Aarti)

॥ श्री अंबाबाईची आरती ॥

(गाताना ओळीवर टॅप करा)

उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो उदोकार गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ ||
अश्विन शुद्धपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो मूलमंत्र – जप करुनी भोवत रक्षक ठेवुनी हो ब्रह्म विष्णू रुद्र आईचे पूजन करिती हो || १ ||
द्वितीयेचे दिवशी मिळती चौषष्ठ योगिनी हो सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदो:कार गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो || २ ||
तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो कणकेचे पदके कासे पितांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविसी अंबे सुंदर दिसे लीला हो || ३ ||
चतुर्थीचे दिवशी विश्व व्यापक जननी हो उपासका पाहसी माते प्रसन्न अंत:करणी हो पूर्णकृपे जगन्माते पाहसी मनमोहनी हो भक्तांच्या माउली सूर ते येती लोटांगणी हो || ४ ||
पंचमीचे दिवशी व्रत ते उपांग ललिता हो अर्ध पाद्य​ पूजेने तुजला भवानी स्तवती हो रात्रीचे समयी करती जागरण हरीकथा हो आनंदे प्रेम ते आले सद् भावे ते ऋता हो || ५ ||
षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेउनि दिवट्या हाती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ताफळा हो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो || ६ ||
सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो तेथे तु नांदशी भोवती पुष्पे नानापरी हो जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो भक्त संकटी पडता झेलुन घेशी वरचेवरी हो || ७ ||
अष्टमीचे दिवशी अंबा अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगद्जननी हो मन माझे मोहिले शरण आलो तुज लागुनी हो स्तनपान देउनि सुखी केले अंत:करणी हो || ८ ||
नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो सप्तशती जप होम हवने सद्भक्ती करुनी हो षडरस अन्ने नेवैद्याशी अर्पियली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्तता केले कृपे करुनी हो || ९ ||
दशमीचे दिवशी अंबा निघे सिमोल्लंघनी हो सिंहारूढ करि सबल शश्त्रे ती घेउनी हो शुंभनीशुंभादीक राक्षसा किती मारसी राणी हो विप्रा रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो || १० ||



Other Aarti Sangrah: