msd sportsfit india

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी “माही” IPL मध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते त्यानिमित्ताने का होईना पण माही क्रिकेट खेळताना दिसेल म्हणून खूष आहेत. धोनीची क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा किंवा स्टाईल हि अनेकांच्या पचनी पडली नाही. किमान त्याने अखेरचा सामना खेळून निवृत्ती घ्यावी असेच सर्वाना वाटत होते. क्रिकेट नसले तरी या ८ गोष्टींमार्फत धोनी कमाई करतो.

  1. Chennaiyin FC फुटबॉल संघ:

आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कि धोनीला गोलकिपर व्हायचे होते पण अपघाताने तो क्रिकेटमध्ये येऊन विकेटकिपर बनला. परंतु त्याने आपली फुटबॉलची आवड थेट फुटबॉल संघ विकत घेऊन जपली आहे. इंडियन सुपर लीगमधील Chennaiyin FC या फुटबॉल संघाचा मालक असून त्यामार्फत तो कमाई करत असतो.

2. Sports Fit by MS Dhoni:

आपण सर्वच जण धोनीच्या फिटनेस विषयी जागृत आहोत त्यापेक्षा

जे सेकंदाच्या आत स्टॅम्पिंगने आऊट होतात त्यांनाच विचारा धोनीचा फिटनेस काय आहे.

SportsFit World Pvt. Ltd. अंतर्गत महेंद्रसिंग धोनी भारतात तब्बल २०० जिम चालवतो.

3. Seven फुटवेअर ब्रँड:

सर्वांनाच परिचित आहे धोनीची जन्मतारीख ७ असून त्याच्या जर्सीचा नंबरसुद्धा ७ आहे. त्यालाच अनुसरून धोनीने Seven फुटवेअर ब्रँडची निर्मिती केली आहे.

4. Mahi Racing Team India:

माही बाईकचा अक्षरशः वेडा माणूस आहे. त्याच्या गॅरेजमध्ये त्याची जुनी यामाहा गाडीसहित इतर महागड्या स्पोर्ट्स बाईकने पार्किंग फुल झाली आहे. धोनी Mahi Racing Team India या टीमचा मालक असून यामार्फतसुद्धा तो कमाई करत असतो.

5. हॉकी टीम Ranchi Rays:

धोनी क्रिकेटसह इतर सर्वच खेळांचा मान ठेवत असतो. जिम, रेसिंग, फ़ुटबॉलसह तो रांची हॉकी टीमचा मालक आहे.

6. Hotel Mahi Residency रांची:

रांचीचा धोनी असून त्याने तिथेच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करून Hotel Mahi Residency चालवत असून त्यामार्फत त्याचा वेगळा इन्कम सोर्स चालू आहे.

7. मनोरंजन विश्वात पाऊल:

धोनीचा बायोपिक आल्यानंतर त्याने मनोरंजन विश्वात प्रवेश करून production house Banijay Asia सोबत डील केलेले आहे. त्यामार्फत प्रोडक्शन हाऊस चालवून तो त्याच्या मेहनतीने कमाई करत आहे.

8. व्यावसायिक जाहिराती:

धोनी सुरुवातीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याचा लूकने अनेकांना घायाळ केले. लांबलचक केस आणि वादळी क्रिकेट खेळीच्या जोरावरती तो अत्यंत कमी वेळेत क्रीडाप्रेमींच्या गळ्यातला ताईत बनला. त्याचसोबत त्याला असंख्य जाहिराती करण्यासाठी मागण्या येऊ लागल्या. तेव्हापासून आज निवृत्त झाला असला तरी जाहिरातींचा ओघ चालूच आहे. एकापेक्षा एक मोठ्या ब्रॅण्डच्या जाहिराती करून अल्पवेळेत तो श्रीमंत बनला. सध्याच्या आघाडीच्या आणि IPL स्पॉन्सर असणाऱ्या Dream11 ची जाहिरात सुद्धा धोनीच करतोय.

अशाप्रकारे कॅप्टन कुल असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने खेळात चमकदार कामगिरी करत शारीरिक कमाईसह व्यावसायिक यश संपादन केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.