IPL-team-owners-income

आपण सतत ऐकतो अमुक खेळाडूला इतक्या कोटी रुपयांत विकत घेतले तमुक खेळाडूला सर्वाधिक बोली लावली. सगळे आकडे कोटींमध्येच असतात. परंतु आपल्याला सतत प्रश्न पडत असतो संघमालक इतका खर्च आपल्या खेळाडूंवर करत असतात पण त्यांना किती पैसे मिळत असतील आणि कसे मिळत असतील. आम्ही नक्कीच आपली यात मदत करू.

सध्याचा काळात कोरोनामुळे लॉकडाऊन त्यात काहीच मनोरंजनाची साधने उपलब्ध होत नव्हती. क्रीडाप्रेमी तर IPL कधी चालू होईल याची वाट पाहत होते. सरकारने सुरक्षेची काळजी केल्यामुळे यावर्षीचा IPL हंगाम दुबईत झाला.

२००८ साली एकूण ८ टीमसह IPL ची घोषणा झाली आणि दरवर्षी IPL ची लोकप्रियता वाढतच गेली आणि त्यासोबत उत्पन्नसुद्धा… IPL ची संकल्पना हि मोदींची. अहं तुम्ही ज्यांचा विचार करताय ते मोदी नाही तर ललित मोदी.

पाहूया BCCI आणि IPL संघमालकांचे इनकम सोर्स:

१. टायटल स्पॉन्सर्स:

dream11ipl-sponsored

हे खरे मुख्य कमाईचे साधन असून सुरुवातीला २००८ साली IPL चे टायटल स्पॉन्सर DLF होते, मागच्या वर्षी VIVO IPL आणि यावर्षीच टायटल स्पॉन्सरशिप Dream-११ ने तब्बल २२२ कोटी रुपयांत खरेदी केले. २२२ करोड रुपयांची विभागणी ६०% संघमालकांना आणि ४०% BCCI घेते.

२. प्रत्येक संघांचे स्वतःचे वेगवेगळे स्पॉन्सर्स:

आपण खेळाडूंच्या जर्सीवर किंवा टोपीवरती लोगो पाहतो ते व्यावसायिक IPL संघांवरील लोगोसाठी संघमालकांना पैसे देत असतात.

उदाहरणार्थ मुंबई इंडियन्स टीमच्या टीशर्टवरती सॅमसंगचा लोगो आहे. हा लोगो कायम TV वरती खेळाडूंमुळे दिसत असतो. परंतु तो लोगो टीशर्टवर झळकण्यासाठी सॅमसंग कंपनी मुंबई इंडियन्सच्या मालकांना पैसे देत असते. साधारण अशा जाहिरातींमुळे संघमालकांना वर्षाला ७० कोटी मिळत असतात.

mumbai-indians-jersey

IPL सुद्धा लोकप्रिय असल्यामुळे ब्रँड आणि कंपन्या आपल्या जाहिरातींसाठी पैसे मोजायला कमी पडत नाहीत.

३. मीडिया राईट्स आणि ब्रॉडकास्टींग:

ipl-broadcast-partner

BCCI चॅनेल सोबत करार करून जो काही पैसे ठरवलं जातो तो ६०:४० प्रमाणे BCCI आणि संघमालकांत विभागला जातो. स्टार नेटवर्क इंडियाने २०१७ साली ५ वर्षांसाठी IPL प्रक्षेपण करण्यासाठी तब्बल १६,३४७ करोड रुपयांचा करार केलेला आहे.

त्यामुळे आपण कोणतीही IPL मॅच स्टार स्पोर्ट्स, किंवा स्टारच्या इतर चॅनलवरच पाहू शकतो. मोबाईलचा वाढता उपयोग पाहता हॉटस्टार ला पैसे भरून आपण कुठूनही मॅच पाहू शकतो.

अशारीतीने ब्रॉडकास्टींगद्वारे सर्वात जास्त कमाई BCCI आणि संघमालकांची होत असते.

४. स्टेडियमवर जाऊन तिकीट खरेदी करून मॅच पाहणारे प्रेक्षक:

ipl-fans-at-cricket-stadium

भारतात सर्वात जास्त लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. कोणी खेळाडूंना देव मानतो तर कोणी आयडॉल. आपल्या आवडत्या खेळाडूला प्रत्यक्ष जाऊन मॅच पाहण्यात अनेक प्रेक्षक भारतभर कोठेही मॅच पाहण्याची हौस ठेवतात.

स्टेडियममध्ये विविध प्रकारचे स्टॅन्ड असतात आणि तिकिटांचा दरसुद्धा वेगवेगळा असतो. यावर्षी जरी कोरोनामुळे प्रेक्षक मैदानात जाऊ शकत नसले तरी दरवर्षी प्रत्येक मालकाला ३५-४० करोड रुपये तिकीट विक्रीतूनच मिळत असतात.

समजा तिकिटाचा दर १००० रुपये आहे. तर ७०० रुपयेचा हिस्सा होमग्राऊंडच्या मालकांना जातो, १०० रुपये BCCI, १०० रुपये रक्कम ज्या राज्यात मॅच आहे त्या क्रिकेट असोसिएशनला आणि उर्वरित १०० रुपये IPL टायटल स्पॉन्सर्स म्हणजेच यावर्षीचा Dream११ या कंपनीला जातो.

तसेच स्टेडियममध्ये खाण्याचे स्टॉल्स असतात त्यामार्फत पैसे कमविले जातात आणि इतर स्क्रीनद्वारे प्रत्येक स्टेडियममध्ये विविध जाहिराती आपल्याला दिसत असतात त्यामार्फतसुद्धा संघमालकांना पैसे मिळत असतात. तिकीट, आवडत्या संघाचे टीशर्ट, झेंडे, चेहऱ्यावरील संघाचा कॉलरफूल टॅटू, आणि इतर स्टेडियममधील स्तोत्रांमधून वर्षाला प्रत्येक संघमालकाला जवळपास ४०० करोड रुपये मिळतात.

५. बक्षिसांमार्फत मिळणारा नफा:

ipl-trophy-2020

जो कोणी IPL चे विजेतेपदक जिंकतो त्या संघाला २० करोड रुपये मिळतात. आता तुम्ही म्हणाल ५०० करोडच्या वरती उत्पन्न असणारे संघमालक २० करोडचा का विचार करत असतील. संघमालकांना विजेतेपद हे २० करोडसाठी नसून मुळात त्यांची ब्रँडव्हॅल्यू वाढविण्यासाठी महत्वाचे असते.

मागील वर्षांपर्यंतच्या आकडे सांगतात कि सर्वात जास्त विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची ब्रँडव्हॅल्यू सर्वात जास्त असून त्या खालोखाल KKR, CSK आणि मग इतर संघ येतात.

जेवढी ब्रँडव्हॅल्यू जास्त तेवढेच जास्त पैसे संघमालकांना जाहिरातदारांकडून मिळत असतात.

या सर्व सोर्सची गोळाबेरीज जर आपण केली तर प्रत्येक संघमालकांना साधारण ५०-६० करोड रुपये प्रत्येक मॅचसाठी मिळत असतात. म्हणजे एक बॉल टाकल्यावरती संघमालकांना २० ते २५ लाख रुपये मिळतात. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण प्रक्षकांना निखळ आनंदाशिवाय बाकी काही मिळत नाही परंतु आपल्यामुळे BCCI आणि संघमालकांना भरमसाट पैसे मिळत असतात.

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.