diljit_dosanjh

नुकतेच दिल्ली सीमेवर पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन चालू केले असून अनेक पंजाबी सेलिब्रिटी, उद्योजक आणि बाहेरील देशांमध्ये राहणाऱ्या पंजाबी लोकांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे.

या आंदोलनावरूनच कंगनाने आंदोलन करणाऱ्यांवर जहरी टीका केली होती त्याला जशास तसे उत्तर देऊन दिलजीतने कंगनाला गप्प केले. इतकेच नाही तर या गोठवणाऱ्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चादर व ब्लॅंकेट पुरवण्यासाठी त्याने तब्बल १ कोटी रुपये देणगी दिली.

कोण आहे दिलजीत दोसांज:


पंजाबमधील दोसांज या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील दिलजितचे खरे नाव दलजित होते. पंजाब संगीत क्षेत्रात आल्यानंतर त्याने दलजितचे दिलजीत असे नामकरण केले.

गाण्याची आवड लहानपणापासूनच असल्याने सुरुवातीला गुरुद्वारामध्ये तो कीर्तने आणि गाणे गाऊ लागला. लोंकाना त्याचा आवाज आवडू लागला आणि सुरुवातीला स्टेज शो, लग्नात गाणे म्हणणे असे करत मेहनतीमुळे २००४ साली तो पंजाब संगीत क्षेत्रात आला.



त्याची गाणी हिट होऊ लागली आणि २००९ साली रॅपर हानी सिंगसोबत गायलेल्या गाण्यामुळे तो रातोरात अंतरराष्ट्रीय स्टार झाला व पंजाबी चित्रपटसुद्धा मिळू लागले.

बॉलिवूड प्रवेश:

सुरुवातीला त्याने रितेश देशमुखच्या ‘तेरे नाल लव्ह होगया’ या चित्रपटात गाणे गायले. त्यानंतर उडता पंजाब चित्रपटात शाहिद व करीन कपूर त चित्रपटात काम केले. फिल्लोरी या चित्रपटात अनुष्का शर्मासोबत त्याने लीड रोल केला.



एवढं सगळं असताना देखील त्याने आपल्या भाषेचा आणि परंपरेचा नेहमीच आदर केला.

बॉलिवूडच्या चित्रपटात मेकओव्हरसाठी त्याला पगडी काढून रोल करायचा होता पण त्याने तो चित्रपट नाकारला आणि असे रोल कधीही करणार नाही असे सांगितले. दिलजीतची इंग्लिश भाषा चांगली नसून तो ते खुलेआमपणे मान्य करतो. कोणताही कमीपणा न ठेवता तो आजही ट्विटरवरती पंजाबी भाषेतच ट्विट करत असतो.

कंगनासोबतचा वाद आणि शेतकऱ्यांना पाठिंबा त्याने पंजाबी भाषेतूनच व्यक्त केला. त्याचे मेसेज ट्रान्सलेट करून देशभर फिरले पण त्याने इंग्लिश भाषेचा बडेजाव केला नाही.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.