ratan tata at tcs

कोरोना काळात लोकडाऊनमध्ये टाटा उद्योग समूहाने जेवढी मदत करता येईल तितकी मदत आपल्या देशबांधवांसाठी केली आहे आणि मदत करणे चालूच आहे. हल्लीच रतन टाटा यांनीसुद्धा ज्या कंपन्या आपल्या कामगारांना कामावरून काढून टाकत होते त्या कंपन्यांना खडे बोल सुनावले होते. आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देत चांगल्या सुविधासुद्धा देण्यामागे कोणतीही कसर ठेवली जात नाही. जाणून घेऊया TCS अर्थात “टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस” च्या यशाबद्दल.

TCS कंपनीने गेल्या वर्षी फक्त तीन महिन्यात ६ हजार ९०४ कोटी रुपयांचा नफा कमविला होता त्यामुळे शेअर मूल्यात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे १०० अब्ज डॉलर्स बाजारमूल्य असणाऱ्या मोजक्याच कंपन्यांच्या यादीत TCS गेल्याने टाटा उद्योग समूह एक महत्वाची बाब जगभरात झाली आहे.

एकूण शेअरची किंमत म्हणजेच त्या कंपनीचे बाजारमूल्य होय. TCS हि १०० करोड अब्ज डॉलर बाजारमूल्य असणारी जगातील ६४वी आणि भारतातील पहिलीच कंपनी ठरली.

विशेष म्हणजे TCS चे बाजारमूल्य हे भारतातील इतर आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या एकत्रित बाजारमूल्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे जर आपण पाकिस्तान शेअर मार्केटचा विचार केला तर जेव्हा TCS ने १०० करोड अब्ज डॉलरचा टप्पा पार केला त्यावेळेस पाकिस्तानच्या शेअर मार्केटचे एकूण मूल्य ८० करोड होते. त्यामुळे एकप्रकारे TCS एकच कंपनी संपूर्ण पाकिस्तानचे शेअर मार्केट विकत घेऊ शकते.

रतन टाटा अविवाहित कसे राहिले:

काही महिन्यांपूर्वी रतन टाटा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते कि ते अविवाहित कसे राहिले. ते अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेले होते त्यावेळेस कॉलेज झाल्यानंतर एका आर्किटेक्चर कंपनीत ते रुजू झाले होते त्यावेळेस त्यांचे एका मुलीसोबत प्रेम झाले होते. मूळ मेकॅनिकल इंजिनिअर असणारे रतन टाटा आपल्या आजीच्या सांगण्यावरून अमेरिकेत आर्किटेक्चरचे शिक्षण घ्यायला गेले होते आणि तिथेच त्यांना एक मुलगी आवडली आणि तिच्यासोबत ते लग्नही करणार होते.

अचानक आजीची तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना तात्काळ भारतात यावे लागले आणि त्याचवेळेस भारत-चीनमध्ये तणाव होऊन युद्ध सुरु झालं.

युद्ध सुरु झाल्यामुळे त्यांच्या प्रियसीला भारतातील वातावरण असुरक्षित वाटू लागलं आणि तिने व तिच्या परिवाराने त्यांना ठामपणे सांगितलं जर तुम्ही भारतात राहणार असलात तर सॉरी हे लग्न होऊ शकत नाही. मुळात त्यांच्या अंगातच देशभक्ती असल्यामुळे त्यांना भारत सोडून अमेरिकेत राहणे काही पटले नाही. त्यामुळे त्या मुलीने लग्नसुद्धा तिकडेच केले आणि रतन टाटा मुंबईत सिंगलच राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.