dairy-project-indian-government-financial-help.jpg

शेतीसोबतच शेतकरी डेअरीचा देखील व्यवसाय करू पाहतो परंतु आर्थिक पाठबळ नसल्यामुळे पाऊल टाकू शकत नाहीत. परंतु अशा इच्छुक शेतकऱ्यांना आता सरकार डेअरी प्रोजेक्टसाठी आर्थिक मदत करणार आहे.

सरकार आता तुम्हाला कर्ज देणार आहे आणि त्यासाठी अनुदानसुद्धा मिळणार आहे.

सरकारने “दुग्धव्यवसाय योजना” काढली असून १० म्हशी घेण्यासाठी आता सरकारतर्फे ७ लाखांचे कर्ज मिळणार आहे. दूध डेअरी उभी करण्यासाठी हे कर्ज पशुधन विभागामार्फत देण्यात येते. यामध्ये खुल्या प्रवर्गाला २५ टक्के अनुदान मिळणार असून आणि महिला व अनुसूचित जाती जमातींना ३३ टक्के अनुदान मिळणार आहे.

ज्यांना दूध डेअरीचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी जवळच्या बँक, क्षेत्रिय बँक, राज्य सहकारी बँक, राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत चौकशी करणे आवश्यक आहे. कर्जासाठी जातीचा दाखला, ओळखपत्र, प्रमाणपत्र आणि व्यवसायाच्या प्रकल्पाचा आराखडा आणि फोटो द्यावा लागेल.

चौकशी केल्यानंतर तुम्हाला एकूण कर्जाच्या फक्त १० टक्के रक्कम भरावी लागणार आहे आणि बाकी ९० टक्के रक्कम सरकार भरणार आहे. जी बँक कर्ज देणार आहे त्या बँक खात्यात अनुदानही जमा होणार आहे. हे कर्ज आपल्या जमिनीची काही कागदपत्रे तारण ठेवून मिळणार आहे. तरी इच्छुकांनी जवळच्या बँकेत सर्व चौकशी करून पुढील निर्णय घ्यायचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.