nagpanchami

श्रावण महिन्यातील पहिलाच सण नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण येतो. सर्पयज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला आस्तिक ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने वर माग असे म्हटल्यावरती सर्पयज्ञ थांबिण्याचा वर त्याने मागून घेतला. जनमेजय राजाने सर्पयज्ञ थांबविला तो दिवस पंचमीचा होता म्हणून श्रावण महिना सुरु झाला कि ५व्या दिवशी नागपंचमी सण साजरा केला जातो.

या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाटावरती नवनागांच्या आकृत्या काढल्या जातात व त्यांची पूजा करून दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवितात.

हा सण खेड्यात जास्त साजरा का केला जातो?

साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. भारत हा शेतीप्रधान देश.साप हा जमिनीत बीळ करून राहतो त्यामुळे तो जमीन पोखरून मऊ करतो. तसेच उंदरांपासून पिकांची नासाडी रोखण्यासाठी सापाची मदत होते. शेतात जर सापांचा वावर असेल चोर हि शेतात चोरी करायला विचार करतो, त्यामुळे सापाला खेड्यात राखणदारही म्हणतात.

या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवरती तवा ठेवू नये असे सांगितले जाते. या दिवशी पुरणाची दिंडे किंवा साखर- खोबऱ्याची दिंडे व इतर सणांना करतात असे पदार्थ केले जातात. नवनागांची पूजा केली जाते नवनाग हे पवित्रकांचे नऊ प्रमुख गट आहेत. पवित्रके म्हणजे सुक्ष्मातिसुक्ष्म दैवी कण (चैतन्यके). नवनागांची नावे: <b>१) अनंत २)वासुकी ३)शेष ४)पद्मनाभ ५)तक्षक ६)कालीय ७)शंखापाल ८)कंषल ९)धृतराष्ट्र

सापांच्या विषाचा उपयोग निरनिराळ्या औषधांसाठीसुद्धा केला जातो. मुंबईच्या हाफकिन इन्स्टिट्युटमध्ये अनेक सापांच्या विषावरती प्रयोग करून औषधे बनविली जातात.

आधुनिकतेची जोड देऊन नागपंचमी कशी साजरी केली जाऊ शकते:

नागपंचमीला नागाची पूजा हळदीकुंकू किंवा चंदन लावूनच करायला हवी असे नाही. हल्ली सर्पहत्येचे प्रमाण वाढले असून त्याची जनजागृती केली जाऊ शकते. सापाबद्दल अनेक गैरसमजुती आहेत. उदाहरणार्थ, साप डूख धरतो, साप दूध पितो, पुंगी वाजविल्यावरती डोलतो. म्हणूनच सोशल मीडियाचा वापर करून आपण या गैरसमजुती दूर करून सर्परक्षण वाढवू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.