lata mangeshkar turns 91

काही मराठी चित्रपटांत अभिनय करून अखेर त्यांनी संगीत क्षेत्रात परार्पण केले आणि स्वातंत्र्यपूर्व काळ वयाच्या ५व्या वर्षापासुन ते आजतागायत लतादीदींनी एकूण २४ भाषांत ३०,००० गाणी गायली आहेत. म्हणूनच त्यांना गानकोकिळा म्हणून पदवी बहाल करण्यात आली.

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोर, मध्यप्रदेश येथे झाला आणि त्या पंडित दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती यांची मोठी मुलगी. लहानपणापासूनच घरामध्ये कला आणि संगीताचे वातावरण असल्यामुळे दीदींनी लहान वयापासूनच आपल्या वडिलांना गुरु मानून संगीत आणि नाटकांमध्ये काम केले.

पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे मूळ आडनाव हर्डीकर असे होते परंतु त्यावेळी ते गोवा मंगेशी येथील असल्यामुळे त्यांनी मंगेशकर असे आडनाव बदलून घेतले.

लता दीदी १३ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्यावर ४ भावंडांसहित संपूर्ण कुटुंबाचा भार आला. बालवयातच कौटुंबिक जबाबदारी आल्याने त्यांना शिक्षण तसेच लग्नसुद्धा करणे जमले नाही.

त्यांनी वडिलांचा कलेचा वारसा तसाच जपला आणि आपल्या भावंडानासुद्धा संगीताचे धडे देण्यास सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळात लतादीदींना हिंदी गाणे गाण्यासाठी रिजेक्ट करण्यात आले होते परंतु गुलाम हैदर यांनी त्यांची प्रतिभा ओळखली होती. त्यांनी लतादीदींकडून १९४८ साली मजबूर या चित्रपटात ‘दिल मेरा तोड़ा, मुझे कहीं का ना छोड़ा’ हे गाणे गाऊन घेतले जे त्यांच्या करिअरमधील पहिले हिट गाणे ठरले.

नूरजहां, शमशाद बेगम यांचा बोलबाला त्यावेळी असायचा. अशा स्पर्धेत जर टिकायचे असेल तर वेगळी शैली अवलंबवावी लागेल म्हणून दीदींनी हिंदी आणि उर्दू भाषेचे व्यवस्थित उच्चारण शिकून घेतले.

१९४९ साली महल चित्रपटात दीदींनी आयेगा आनेवाला हे गीत मधुबालावरती चित्रित करण्यात आले आणि त्या हिट गाण्यानंतर मग त्यांनी मागे वळून पहिलेच नाही. १९५० ते १९७० च्या काळात अनेक नावाजलेले चित्रपट, नट, संगीत दिग्दर्शक पुढे येत होते त्यामुळे लतादीदींचा हा सुवर्णकाळच होता.

त्याकाळात अनेक मान्यवरांसोबत काम करून गायलेली अनेक गीते अजरामर झाली आणि ती गाणी आपण आजही ऐकतो.

SD बर्मन, RD बर्मन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, शंकर जयकिशन, वसंत देसाई या संगीतकारांसोबत अनेक नावाजलेली गीते दीदींनी गायली. किशोर कुमार यांच्यासोबत गाण्यांची जोड सुपरहिट ठरली.

प्रत्येक निर्मात्याला आपल्या चित्रपटात लता मंगेशकर यांचे एक तरी गाणे असावे म्हणून ते लाईन लावून तारखा मिळवण्यासाठी वाट पाहायचे.

जवळपास ६ दशके आपल्या आवाजाची मोहिनी घालणाऱ्या लतादीदींवरती सन १९६२ मध्ये विषप्रयोगसुद्धा करण्यात आला होता. पण त्यांना मारण्याचा प्रयत्न कोणी केला ते नाव मात्र समोर आले नाही.

त्यांच्या या भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. १९६९ साली पदमभूषण, १९८९ साली दादासाहेब फाळके पुरस्कार, १९९९ साली पदमविभूषण आणि अखेरीस २००१ साली भारताचा सर्वोच्च पुरस्कार ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्यात आले.

मध्यप्रदेशमध्ये तर लतादीदींच्या नावानेच पुरस्कार दिला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.