Ganesh utsav 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकतेच गणेश उत्सव आणि बकरी ईद साजरी करण्यासंदर्भात काही सूचना आणि आदेश दिले आहेत, ज्यांचे पालन सर्व जनतेला करणे अनिर्वाय आहे.

  • कृत्रिम तलाव: महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.
  • मंडप उभारणे: न्यायालय, महापालिका आणि इतर स्थानिक प्रशासनाने करण्यात आलेल्या मंडपाबाबतचे धोरणांशी सुसंगत असे मंडप उभारणे.
  • गणेश मूर्तीची उंची: सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट आणि घरगुती गणपतीसाठी २ फूट मर्यादा ठेवण्यात आली आहे.
  • विसर्जन: शक्यतो पर्यावरणपूरक मूर्ती असावी जिची घरच्या घरीच विसर्जन करता येईल. किंवा जवळच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे.
  • उत्सवाकरिता देणगी: देणगी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा, तसेच जाहिराती प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे.
  • प्रशासनाची परवानगी: सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
  • आरती व भजन: आरती व भजन तसेच कीर्तने आयोजित केल्यास गर्दी होणार नाही तसेच ध्वनीप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन कारण्यात्त यावे.
  • दर्शनाची सुविधा: श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन,केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यांदींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  • निर्जंतुकीकरण: गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे.
  • दर्शन: प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळले जातील याकडे विशेष लक्ष द्यावे.
  • आगमन व विसर्जन मिरवणूक: गणपतींचे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजूनही काही सूचना प्रसिद्ध होऊ शकतात त्यांचेसुद्धा पालन करावे लागेल असे महाराष्ट्र सरकारतर्फे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.