आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खेड पासून ६५ किलोमीटरवर असलेल्या दुर्गम भागात वसलेल्या चोरवणे गावात “आम्ही शिवभक्त परिवार महाराष्ट्र” आयोजित २०२१ या वर्षीचा पहिला शैक्षणिक उपक्रम राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त ( तिथीनुसार ) रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा , चोरवणे – शिंदेवाडी येथे दिनांक ०३/०७/२०२१ रोजी पार पडला.
ग्रामीण भागातील मराठी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वह्या,पेन, पेन्सिल, रबर,चित्रकला वही, कंपास इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद शाळेला शिवरायांची प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात परिवारातील शिवकन्या अंकिता गुरवने गारद देऊन केली
आम्ही शिवभक्त परिवाराचे श्री दीपेश दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आम्ही शिवभक्त परिवार नेहमीच गड किल्ल्यावर जाऊन संवर्धन करणे (स्वःच्छता करणे) हा परिवाराचा मुख्य अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले परिवारातर्फे आम्ही रक्तदान शिबिर तसेच ईतर सामाजिक उपक्रम राबवत असतो.श्री सुदर्शन जाधव यांनी आम्ही शिवभक्त परिवाराला शैक्षणिक उपक्रम करायची संधी दिल्या त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
तसेच अजित सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य ही मदत नसून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून देत आहोत असे सांगितले. उपक्रमात श्री सुदर्शन जाधव यांनी सूत्रसंचालना सोबतच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर उपक्रमात आम्ही शिवभक्त परिवाराचे श्री दिपेश दळवी, अजित सकपाळ,सुरज सोलकर, आदीनाथ भोसले व कु.अंकिता गुरव उपस्थित होते. तसेच चोरवणे शिंदेवाडी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.राजेंद्र भोसले,श्री.प्रशांत उतेकर, श्री.सुदर्शन जाधव व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
