sunil tatkare and ajit pawar

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर काल (दि. 2 जुलै रोजी) विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत (Ajit Pawar) ४० आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण ९ जणांनी शपथ घेतली.

त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकाणात नव्या पर्वाला सुरूवात झाली असून, शपथविधीनंतरही अनेक घडामोडी घडत असून, बंडखोरी केलेल्या राष्ट्रवादीच्या ९ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईबाबत हालचाली सुरू करण्यात आली आहे.



याच दरम्यान आता नवी माहिती समोर येत आहे. सुखासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवगिरी बंगल्यावर झालेल्या अजित पवार गटातील राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. अजित पवार हे अधिकृत पत्र काढून त्याबाबत घोषणा करतील, असं सांगण्यात येतंय.



खासदार सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवगिरी बंगल्यावर झालेल्या अजित पवार गटातील राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्ष पातळीवर पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी सुरुवात केली आहे. जयंत पाटलांना हा धक्का समजला जात आहे.





आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.