अनुफूड इंडिया मार्फत १४ ते १६ सप्टेंबर २०२२ दरम्यान मुंबई येथे इंटरनॅशनल एक्सिबिशन भरविण्यात आले होते. यावेळी भारतासह जगभरातील तब्बल ३०० कंपन्यांनी सहभाग घेतला होता.

हे Exhibition उद्योगवाढीसाठी भरवले जाते. ज्यामध्ये B२B प्लॅटफॉर्म अंतर्गत फक्त बिझनेसमन भेट देत असतात. यावेळी Ministry of Food Processing Industries (MoFPI) अंतर्गत भारतातून फक्त १८ उद्योग सहभागी करण्यात आले होते ज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील एकमेव स्नेहग्रो एंटरप्रायजेस यांचा सहभाग करण्यात आला होता. त्यामुळे संचालक दीपक कासार व स्नेहा दीपक कासार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहेत.
Exhibition मध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक उदयोगांना ३ दिवसांच्या कालावधीसाठी तब्बल १.५ लाखांपर्यंत फी आकारली गेली असून देश-विदेशातील अनेक उद्योजक, MD, डायरेक्टर सहभागी झालेल्या उद्योगांची भेट घेऊन डील करत होते तसेच अधिक माहिती घेत होते.
संचालक दीपक कासार यांच्या स्नेहग्रो स्टॉलला प्रल्हाद सिंग पटेल (union minister of state, ministry of food processing industries and union minister of state, ministry of jal shakti) यांच्यासह अनेक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या व उद्योगासंबंधी माहिती घेतली.




आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group