उरण दि 6 (विठ्ठल ममताबादे)- आधी तोरण गडाला मग माझ्या घराला या अनुषंघाने सालाबादप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा भौगोलिक व ऐतिहासिक दृष्टया महत्व असलेल्या आवरे येथील मर्दनगड किल्यावर मर्दनगड संवर्धन समिती व बा रायगड परिवारातर्फे दसऱ्याच्या निमित्ताने सीमोल्लंघन उत्सव व गडपूजन सोहळा मोठ्या उत्साहाने व श्रध्देने साजरा करण्यात आला.
मोठया संख्येने उपस्थित राहिलेल्या शिवभक्तांनी प्रथमतः गडाची साफसफाई केली. गडाला तोरण बांधून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले . मर्दनगडाचे गड पूजन केल्यानंतर भगवा ध्वज फडकविण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कौशिक ठाकूर ,शंकर पाटील,दिलेश ठाकूर, विजय गावंड,दिपेश ठाकूर, सुजित ठाकूर, तुषार म्हात्रे,मयुरेश पाटील ,संजित भोईर, ओंकार गुलप, प्रशांत अत्तिरकर,सुदर्शन घवाळी , शिर्के ,नितीन बोडेकर,सुनील दिवे ,प्रसाद खैरणार डोंबिवली,कल्पेश भोकरे ,अक्षय धुरी,स्वरांग ठाकूर, स्पंदन ठाकूर उपस्थित होते.
Cannot collect videos from this channel. Please make sure this is a valid channel ID.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
