मिलिंद माने: शहरातील तांबट आळीमधील दहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सुयश सुनील नगरकर या विद्यार्थ्याने घरातील वडिलांचे शिकारीच्या बंदुकीने डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार महाडमध्ये घडला.
महाड शहरामधील तांबट आळीमधील सुनील नगरकर यांचा दहावीत शिकणारा मुलगा सुयश नगरकर याने घरातील शिकारीची बंदूक घेऊन डोक्यात गोळी घालून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. त्यामध्ये सुयश नगरकर हा जागीच मृत पावल्याने याबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाड शहरातील तांबट आळीमध्ये राहणारे सुनील नगरकर यांनी शिकारीसाठी बंदुकीचा परवाना घेतला होता.

घरामध्ये असणारी बंदुकीची कल्पना त्यांच्या दहावीत शिकणाऱ्या सुयशला पूर्वीपासूनच होती. मात्र आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्याच बंदुकीचा चाप ओढून डोक्यात गोळी घालून घेण्याचा प्रकार सुयश नगरकर या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केल्याने याबाबत तांबट आणि परिसरात व महाडमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे. याबाबत महाड शहर पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहे.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group