सुदर्शन लक्ष्मण चिपोलकर राहणार मेंदडी-म्हसळा व त्याचा मित्रा प्रमोद जगदीश पाटील मेहदंडी- म्हसळा हे दोघेजण आपल्या पल्सर मोटारसायकल वरून मेंदडीकडे जात असताना त्यात दरम्यान मुरुड खामदे शाळा शिक्षक श्री अविनाश पाईकराव हे आपल्या मोटार सायकल युनिकाॅन या गाडीवरून मुरुडकडे जात असताना आगरदांडा येथील रस्तावर समोर समोर येऊन जोरदार धडक लागल्याने त्यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
धडक ऐवढी जोरदार होती की दोन्ही चालकांच्या तोंडाला, डोक्याला मोठ्या जखमा झाल्याने रस्तावर रक्तच रक्त पसरलेले होते व एकजण किरकोळ जखमी अवस्थेत येणाऱ्या नागरिकांनी पाहिले. घटना स्थळी थांबुन आगरदांडा येथील खोत यांनी ॲम्ब्युलन्स त्वरित बोलवली व लगेच त्यांना रुग्णालयात दाखल केले.
गंभीर दुखापत असल्याने जखमीना पुढील उपचारासाठी त्याच ॲम्ब्युलन्स मधून तिघांना अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आपघाताची बातमी कळताच मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई घटनास्थळी येऊन पुढील तपास करीत आहेत.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group