भारतीय रेल्वे प्रमाणेच आता एसटी महामंडळानेसुद्धा माफक दरात नाथजल योजना राबविण्याची घोषणा केलेली आहे. नाथजल शुद्ध जल योजनेचा लोकार्पण सोहळा नोव्हेंबरपासून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला.
नाथजल नामकरण कसे ठरले:
आपल्या महाराष्ट्र राज्याला वारकरी संप्रदायाची महान परंपरा लाभली आहे. यात गुरूला नाथ असे म्हटले जाते म्हणून एसटीच्या या बाटलीबंद जलास नाथजल हे नाव देण्यात आले आहे.
नाथजल पाण्याची किंमत:
नाथजल दोन प्रकारात मिळणार आहे. ६५० मिली बॉटल रुपये १० आणि १ लिटर बाटलीची किंमत १५ रुपये असणार आहे.
टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व बसस्थानकावर नाथजल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बसस्थानकात इतर कंपन्यांच्या पाणी बॉटल विक्रीला बंदी असणार आहे. नाथजल पाणी पुरवण्यासाठी Oxycool या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे.