स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर हजारोंच्या संख्येने शिवभक्त, पर्यटक येत असतात. मात्र गडाच्या चित्त दरवाजाजवळ पुरातत्व विभागाने उभारलेल्या तिकीट खिडकीतून पर्यटक, शिवभक्तांची कराच्या नावाखाली जबरदस्तीने पैशांची लूट केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.



एकीकडे कर घेतला जात असताना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नसल्याने शिवभक्तांनी व शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, किल्ले रायगडावरील पुरातत्व विभागाच्या तिकीट खिडकीचा कडेलोट केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत शिवभक्तांनी परिसर दणाणून सोडला होता.


error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.