amruta fadanvis trolled

नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत २०२१ – २०२२ साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. करोनाच्या महामारीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या देशाची पुढील दिशा काय असणार हे अर्थसंकल्पात पाहायला मिळाले.

अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटचे भाजपकडून कौतुक करण्यात येत आहे. या कौतुकात आता माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची भर पडली आहे. मात्र अमृता फडणवीस यांनी केलेल्या कौतुकात नेटकऱ्यांनी चूक शोधून काढत त्यांना भलतेच ट्रोल केले आहे.



अमृता फडणवीस अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना ट्विट करत म्हणाल्या की, मागील 100 वर्षांमध्ये कधी पाहण्यात आला नाही अशापद्धतीचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचे आभार. कराचा बोजा सर्वसामान्यांवर न टाकता विकासाला प्रेरणा कशी द्यायची हे आता सर्व देश आपल्याकडून शिकेल, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. या ट्विटवरून अमृता यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.



भारताला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली आहेत. मात्र अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये 100 वर्षात असा अर्थसंकल्प पाहिला नाही, असा उल्लेख केला आहे. यावरून अमृता फडणवीस यांना अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी विचारले आहेत. तुम्ही नक्की भारतीय आहात का, असा प्रश्नही एकाने विचारला. तर एकाने अमृता फडणवीस यांना बजेटवर एखादं गाणं येऊ द्या, अशी विनंती केली आहे.



error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.