tala antigen test

आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट


शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची तळा पोलीस प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे. एकीकडे कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी सारखे नियम लागू केले असताना बाजारपेठ बंद झाल्यानंतरही तळा शहरात विनाकारण अनेकजण बाहेर फिरत असतात.

या पार्श्वभूमीवर तळा शहरात दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी तळा पोलीस प्रशासनाने करण्यास सुरुवात केली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या महिनाभरापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले असताना देखील त्या निर्बंधाना नागरिक जुमानत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ह्या नियमांना न जुमानता नागरिक सर्रासपणे रस्त्यावर फिरताना दिसत असून कोरोना बाबत त्यांच्या मनामध्ये कोणतेही गांभीर्य नाही हे लक्षात आल्यामुळे जे नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरत असतील अशा लोकांची त्याच ठिकाणी रस्त्यावर अँटीजन टेस्ट तळा पोलीस व आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.



त्यामुळे नागरिकहो घरीच राहा सुरक्षित राहा विनाकारण फिरताना आढळल्यास कोरोना चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सुरेश गेंगजे पीएसआय शिवराज खराडे, तळा पोलीस ठाणे कर्मचारी वर्ग व आरोग्य विभाग कर्मचारी उपस्थित होते.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.