आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट
कोकणात दरवर्षी तुफानी पाऊस पडत असतो. या कारणासाठी दोन दिवस लॉकडाऊन लावण्याची गरज काय? असा प्रश्न रायगडकर जिल्हाधिकार्यांना विचारत आहेत. रायगड जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीचा अंदाज चुकल्यानंतर, सोशल मीडियावर हवामान खाते आणि जिल्हाधिकारी या दोघांनाही ट्रोल करण्यात येत आहे.
10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी किंवा ढगफुटीही होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. या पार्श्वभूमीवर रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दोन दिवसांचा कडक लॉकडाऊन पुकारला होता. गेले महिनाभर कोरोनाचा लॉकडाऊन चालू असतानाच जिल्हाधिकार्यांनी पावसाचा लॉकडाऊन लावला.
हा निर्णय रायगडच्या पालकमंत्र्यांनी 8 जून रोजी लावलेल्या बैठकीतील चर्चेनुसार घेण्यात आला. अर्थातच हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षिततेचा दृष्टीनेच घेण्यात आला होता, मात्र अचानक घेतलेल्या या निर्णयाला लोकांना नापसंती दर्शवली होती. त्यातच पाऊस पडलाच नाही तरी सर्व दुकाने बंद ठेवल्याने दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंचा तुटवडा जाणवला आहे.
या कारणास्तव नेटीझननी प्रशासनाला जाब विचारला असून कोकणात पाऊस किती पडतो? हे जिल्हाधिकार्यांना माहिती नाही का? आता पावसाळ्यात पण दुकाने बंद ठेवायची का? कोकणात सलग 15 दिवस पाऊस पडायचा, सूर्यदर्शनासाठी वाट बघायला लागायची. मुसळधार पाऊस पडूनही तेव्हा भितीचे वातावरण नसायचे आणि आता दोन दिवसांच्या इशार्यालाही आपण घाबरतो.
अतिवृष्टी होणार म्हणून दुकाने बंद ठेवली गेली. प्रत्यक्षात पाऊस पडलाच नाही. व्यावसायिकांचे झालेले नुकसान शासन भरुन देईल का? असा सवालही एका नेटीझनने विचारला आहे. खरचं अतिवृष्टी होईल म्हणून लोक घाबरून घरात थांबले होते, एकंदरीत हवामान खात्याचे हल्ली बरोबर येणारे अंदाज पावसाबाबत मात्र चुकले. त्यामुळे रायगड जिल्हाधिकार्यांना रायगडकरांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे.
आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group
