आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट



पोलादपूर- संदिप जाबडे: पोलादपूर तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या कुडपण गावातील सामाजिक संस्था, पोलादपूर तालुका रहिवाशी संघाचे अध्यक्ष व उद्योजक किसन दादा भोसले, पो.ता.र.संघाचे कार्याध्यक्ष अरविंद चव्हाण,पो.ता.र.संघाचे सचिव राजू मोरे श्री काळभैरवनाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू कदम, कार्याध्यक्ष अनंत जाधव आधारस्तंभ रवींद्र शिंदे,सुजय प्रतिष्ठान चे सुरेश सकपाळ रायगड मित्र मंडळाचे राजेश पवार आणि कृष्णा रामजी कदम,अजय सकपाळ, गणेश जाधव, सुनील कदम, सुनील उत्तेकर, कॅप्टन राम भोसले, शंकर खरोसे, सचिन पार्टे, सोपान चिकणे, ज्ञानेश्वर खरोसे, पी.टी. जगदाळे, के.पी. जगताप, मनोहर चिकणे,जयराम जाधव आदी पोलादपुर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व कोकणवासीयांनी केलेल्या पाठपुराव्याने पुणे स्टेशन ते भोर, महाड, पोलादपूर मार्गे कुडपण बस सेवा १५ जुलै २०२१ पासून सुरू करण्यात आली. या सेवेचा छोटेखानी उद्घाटन समारंभ दुपारी २ वाजता पुणे स्टेशन येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभाचे अध्यक्षस्थान किसन दादा भोसले यांनी भूषवले.



पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडपण पर्यटन क्षेत्राचा विकास होण्याकरिता कुडपण ग्रामविकास संस्थाचे अध्यक्ष सुनील रामचंद्र चिकणे यांच्या सहीसोबत चे निवेदन एसटी प्रवाशी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जमा करण्यात आले होते.



त्यात बोरिवली ते कुडपण, ठाणे ते कुडपण, नालासोपारा ते कुडपण, कल्याण ते कुडपण, पूणे ते कुडपण, महाबळेश्वर ते कुडपण आणि गणपतीपुळे ते कुडपण अशा बससेवांच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार पाठपुरावादेखील करण्यात आला होता. यालाच अनुसरून प्रथम बोरीवली ते कुडपण ही पहिली बस सेवा सुरू करण्यात आली.



त्यानंतर पुणे स्टेशन ते कुडपण सेवा सुरू करण्यात आली आहे. सदरील बस ही पुणे स्टेशन येथून दुपारी १२:३० मिनिटांनी कुडपण कडे रवाना होईल तर सकाळी ६ वाजता ही बस कुडपण येथून पुण्याकडे रवाना होणार आहे. ही बससेवा सुरू होण्यासाठी एसटी प्रवाशी संघटना महाराष्ट राज्य यांची कोर टीम आणि कार्याध्यक्ष शांताराम जुवले(मुंबई विभाग), विद्याधर पाटणकर(पुणे विभाग), सुरेशराव मराठे, अशोक चिकणे यांनी विशेष सहकार्य केले. उपस्थित कोकणवासीयांनी या सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.


आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

Raigad Explore Ads with us
error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.