st mahamandal strike 2021


ऐन दिवाळीत संप पुकारणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाने मोठा दणका दिला आहे. राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात आता एसटी महामंडळाने आक्रमक पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत संपात सहभागी झालेल्या 45 आगारांतील तब्बल 376 कर्मचाऱ्यांवर महामंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे.



एवढेच नव्हे तर संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर ‘एक दिवसासाठी आठ दिवस’ यानुसार पगार कपातीची कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार, की पेटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



राज्य शासनात विलीनीकरण आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्याच्या मुद्दय़ावरून एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या 13 दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी संप पुकारला होता. या संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. वाहतुकीचे साधन उपलब्ध नसल्याने मिळेल ते खासगी वाहन पकडत प्रवाशांनी प्रवास केला. काही ठिकाणी तर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे वसुल केले.



दुसरीकडे दिवाळीत काही प्रवाशांनी आधीच एसटी बसचे आरक्षण करून ठेवले होते. मात्र बस बंद असल्याने एसटी महामंडळाकडून प्रवाशांना तिकिटांचा परतावा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शहरांपेक्षा ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल झाले. काही ठिकाणी धोकादायकरित्या प्रवासी वाहतूकही झाली. एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी प्रवासी बस, शालेय बस, कंपनीच्या मालकीच्या बसगाडय़ा विविध आगारांत आणून उभ्या केल्या आणि प्रवाशांना बससेवा दिली.

दरम्यान निलंबन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये वर्धा, यवतमाळ विभागातील सर्वाधिक कर्मचारी असल्याची माहिती मिळते आहे. महामंडळातील 31 विभागांपैकी 16 विभागांतील 45 आगारांमधील 376 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाने दिली.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.