we are lost


निवडणूक झाली… आणि राजकीय पक्षांना मिळालेल्या सीट पाहून सत्तास्थापनेच घोडं आडलं. पहाटेचा शपथविधी झाल्यावर काही तासांसाठी बनलेलं सरकार पडलं.. अनेक भेटीगाठी, बातम्या, पत्रकार परिषद आणि टीका-टिपण्यांचा खेळ महाराष्ट्राची जनता अनेक दिवस पाहत होती. शेवटी महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस मिळून एकदाची सत्ता स्थापन झाली…



स्वप्नातसुद्धा मतदारांना वाटलं नसेल अशी एक आघाडी स्थापन झाली.. एक महाविकास आघाडीच्या नवीन प्रयोगामुळे निवडणुकीपूर्वी एकमेकांना शाब्दिक हल्ल्यात ओरबाडणारे नेते आज सत्तेमुळे एकत्रित होते तर काही पक्षांतर केल्यामुळे विरोधी बाकावर होते.

मतदारांना पण शेवटी वाटले की हा एक प्रयोग आहे पण चालला तर आपलंच भलं होईल.. केंद्रात सत्ता वेगळ्या पक्षाची आणि राज्यात वेगळी.. पण आज जी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे त्यामुळे पक्ष कोणतेही असोत पण गंडलो गेलो ते आपण मतदारच.. विकास व्हावा म्हणून अजूनही आपण आस लावून बसलोच आहोत.



वास्तविक मुद्दाच मुळात हरवला आणि त्यासोबत आपला मतदार आणि मागण्यासुद्धा…! राजकीय तमाशा इतका गाजतोय की प्रमुख मुद्दे बाजूला राहिले आणि चढाओड लागली ती याला तुरुंगात टाक त्याला नोटीसा पाठव.. चाललीय फक्त असंस्कृतपणाची चढाओढ..

2019 पासून महाराष्ट्रात विकास होतही आहे पण त्यापेक्षा वरचढ ठरलेय ती सर्वच राजकीय व्यक्तींनी चालवलेली प्रकरणे.. एका मागोमाग एक अशा अजब-गजब गोष्टी बाहेर पडत आहेत जणू त्यावर एखादी वेब सिरीज जरी काढली तरी असंख्य एपिसोड्स तयार होतील..

या लेखात कोणाही एका व्यक्तिमत्वाला किंवा पक्षाला दोष देण्याचा कोणताच प्रयत्न नाही. दोष या विशिष्ट चाललेल्या राजकीय तमाशाला आहे… कारण त्यात भरडला गेलाय सामान्य माणूस, तुमच्या-आमच्यासारखा एक टॅक्सपेयर…

किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढायचं काम हाती घेतलं.. तिकडे संजय राऊत नेहमी पलटवार करायला तयार, मध्येच अर्णब गोस्वामी प्रकरण आलं लगेच सुशांत सिंगच्या आत्महत्येच राजकारण, संजय राठोड प्रकरण, माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, शाहरुख खानच्या मुलाचं ड्रग्स प्रकरण लगेच नवाब मलिक प्रकरण लांबवत नेले, एसटी विलीनीकरणाच्या तिढ्यात ६ महिने ग्रामीण भागातील जनतेचे हाल झाले आणि मूळ मुद्दे अज्ञातवासात…

विषय भरकटत नेले आणि विकासाचे मुद्दे फाईलवरच राहिले.. सर्वत्र विकास आणि मूलभूत गरजांचे मुद्दे कोरोनामुळे आडगळीत पडले आणि रंगत राहिला फक्त राजकीय तमाशा.. तुम्ही भांडत रहाल एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप कराल पण त्याचा काडीमात्र फायदा जनतेला होत नाही..

गरज चांगल्या शिक्षणाची, चांगल्या वैद्यकीय सेवांची, महागाईवर आळा बसावा अशा प्लॅनिंगची आहे पण राजकीय गढूळ वातावरणात सामान्य माणूस रुतून राहिला आणि धर्माच्या जाळ्यात अडकून राहिला..

आज खजूर माझा नारळ तुझा, गाय आमची बकरी तुमची, लिलीच फुल आमचं झेंडूची फुले तुमची, आमच्या भोंग्यावर हे लावू तुमच्या ते.. मुळात आपण या गोष्टींमध्ये अडकलो नाही तर अडकवलो गेलोत..

भांडायचं आहे तर निसर्गाचा ऱ्हास होतोय, वातावरणातील गंभीर बदल, पाण्याची टंचाई, पुरेसी वीज नाही, चांगले रस्ते नाहीत, शिक्षण नाहीत यावर खरं तर भांडायला हवं.. या गोष्टी घडवाव्यात असं कोणाला वाटतं असेल-नसेल पण त्याचा गंभीर परिणाम हळू-हळू का होईना पण सर्वांनाच जाणवतोय..

सांगायचा मुद्दा हाच आहे की भारतात टॅलेंटची कमी नाही हे अमेरिकेत आघाडीवर असलेल्या भारतीय CEO ना पाहून समजतेच पण आपण हे माहित असूनसुद्धा त्याचा वापर करत नाही आणि मग साध्या मूलभूत गरजा मिळण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे उंबरे झिजवतो..

संविधानिक आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करून लोकप्रतिनिधिंना आपण कशासाठी निवडून देत आहोत त्याची सतत जाणीव केली पाहिजे.. यासाठी चौथा स्तंभ असेलही पण आपल्या हातात असणाऱ्या सोशल मिडीयाचा चांगल्या कामासाठी वापर केला गेला पाहिजे.. शेवटी जे पेराल तेच उगवणार आहे..!
– लेखनसीमा..
आस्वाद वारे (TaxPayer)



आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.