sarpanch chashak uran


उरण दि १९(विठ्ठल ममताबादे)- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून धुतुम गावात कोरोना नंतर दुसऱ्या वेळी “रजनी क्रिकेट स्पर्धा” म्हणजेच “सरपंच व उपसरपंच चषक २०२२” पार पडला. “आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक संस्था धुतुम ” तर्फे आयोजित या स्पर्धेत २४ संघांनी सहभाग घेतला, अतिशय शिस्तप्रिय कुठलाही गालबोट न लागता PTC LIVE च्या माध्यमातून उत्कृष्ठ पंच कमिटी आणि समालोचक आणि संस्थेच्या पदाधिकारी मित्र परिवार तसेच गावच्या तरुणांनी “प्रकाश झोतात” झालेल्या या कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले.



या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला तो स्वर्गीय मेघनाथ प्रतिष्ठान जासई, द्वितीय क्रमांक ओम साई दारावे, तर तृतीय क्रमांक भैरवनाथ धुतूम यांनी जिंकला. उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट सायकल, गोलंदाज, शेत्ररक्षक स्पोर्ट सायकल, मालिका वीर म्हणून बाईक देण्यात आली. व अशी अनेक पारितोषिके प्रदान करण्यात आली. तीन दिवस चालेल्या या स्पर्धेत समाजातील विविध मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली.सर्वांचे स्वागत सत्कार करण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष शरद ठाकुर तसेच पदाधिकारी यांनी केले.



या कार्यक्रमात समाजातील 8 मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्या मध्ये डि.आर.ठाकूर,रायगड भूषण नितेश पंडित.रायगड भूषण डॉक्टर सुधीर मुंडेकर, डॉक्टर कु.दिव्या गणेश ठाकूर, नमिता नितीन ठाकूर, दत्ता हरिश्चंद्र ठाकूर, अभय रघुनाथ ठाकूर, आणि आपली किडनी सुनेला किडनी दान करणारे दानशूर व्यक्तिमत्व प्रभाकर एकनाथ ठाकूर यांचा संस्थेच्या वतीने सन्मानपत्र शाल व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.



या कार्यक्रमा चे उद्घघाटक जे एम् म्हात्रे उद्योगपती जे.एम. इन्फ्रा प्रोजेक्ट यांनी केले. तर प्रितम दादा म्हात्रे विरोधी पक्ष नेते पनवेल म.न पालिका, माजी जि. प सदस्या कुंदाताई ठाकुर, वैजनाथ ठाकुर, माजी सभापती नरेश शेठ घरत, संतोष शेठ घरत सरपंच जासई, दिपक भाई, रमाकांत म्हात्रे, जगजीवन भोईर , विनोद शेठ म्हात्रे, विकास घरत, कलासागर चे श्रीकांत मुंबईकर, ग्रामपंचायत सरपंच रेश्मा शरद ठाकुर, माजी सरपंच धनाजी शेठ ठाकुर, श्याम भाई ठाकुर, माजी उपसरपंच सदानंद ठाकुर, सुंदर पाटील, माजी उपसरपंच वैशाली पाटील, माजी उपसरपंच आशा ठाकूर, माजी उपसरपंच सविता ठाकुर, प्रभाकर हरिश्चंद्र ठाकुर, राजेश भाई ठाकूर, रामचंद्र ठाकुर, अमृत रा. ठाकूर, नामदेव ह.ठाकुर, संजय मोहन ठाकुर, पुंडलिक गोपीचंद ठाकूर , प्रकाश भाऊ ठाकूर भाजपा उपाध्यक्ष उरण, बाजीराव परदेशी माजी जि.प.सदस्य, शंकर अनंत ठाकूर काँग्रेस अध्यक्ष धुतूम्, अमृत गोपीचंद ठाकूर माजी सरपंच, कुंदन पाटील शिवसेना शाखाप्रमुख, रोशन ठाकूर भाजप अध्यक्ष धुतूम यांची विशेष उपस्थितीती लाभली.

अनेक ग्रामस्थ यांनी कार्यक्रमास भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष शरद ठाकुर, उप अध्यक्ष महिंद्र ठाकुर, सेक्रेटरी मेघनाथ ठाकुर, खजिनदार नंदेश ठाकुर, जयेश राजाराम घरत, जयेश रघुनाथ घरत, संतोष ठाकुर, विनोद ठाकुर, हीतेन पाटील, प्रकाश ठाकुर, नितीन ठाकुर, सुनील ठाकुर, प्रकाश पुंडलिक ठाकुर, तुकाराम ठाकुर,अमित ठाकुर, करण ठाकुर, निलेश ठाकुर, दत्ता ठाकुर, रोनी ठाकुर, चंद्रकांत ठाकुर, प्रदीप ठाकुर, भाई ठाकुर, नवीन पाटील, श्रेयस ठाकुर, प्रमिद ठाकुर, प्रणित ठाकुर, संकेत ठाकुर, सारंग ठाकुर, पिंट्या ठाकुर तसेच गावातील तरुण यांच्या सर्वांच्या सहकार्याने नियोजित कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला. या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्वच दात्यांचे आभार आणि सर्वांनी घेतलेल्या अथांग परिश्रमा मुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगत सर्वांचे आभार आयोजकांनी मानले.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.