lions club dronagiri social work


उरण दि 19(विठ्ठल ममताबादे)– लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी उरणच्या कार्यतत्पर सचिव मोनिका चौकर यांना श्री स्वामी समर्थ मठाच्या संचालिका लायन स्नेहा नवाळे यांनी जेव्हा उरण मधील अतिशय हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या एका वृद्ध आजारी महिलेची श्रीमति आशालता मधुकर म्हापणकर,राहणार विनायक(उरण )यांची माहिती दिली.



तेव्हा त्यांनी त्या वृध्देची प्रत्यक्ष भेट घेतली व औषधोपचाराची व्यवस्था करुन ठाणे येथील खुशिया फाऊंडेशनच्या अनंता खुशिया नीवास या वृध्दाश्रमात दाखल केले.



तिथे त्यांची आता उत्तम काळजी घेतली जात आहे.सदर वृद्ध महिलेला योग्य ठिकाणी नेण्यासाठी, तिला न्याय देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीचे अध्यक्ष संदिप म्हात्रे व लायन मोनिका चौकर,लायन सुषमा काळे,लायन भुमिका सिंग व लायन सागर चौकर तसेच लायन आश्वीनी धोत्रे यांनी मोलाची साथ दिली.



वृध्द महिलेच्या कुटुंबीयांनी याबद्दल लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीच्या सर्व सदस्यांचे आभार मानुन कृतज्ञता व्यक्त केली आहे.


आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर टेलिग्राम शेअरचाट

Raigad Explore Ads with us

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in

पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group

error: पोस्ट कॉपी-पेस्ट होणार नसल्यामुळे माहिती शेअर नक्की करा.