उरण दि 19(विठ्ठल ममताबादे)- उरण तालुक्यातील पिरकोन गावात प्रतिक्षा दिनानाथ म्हात्रे(सुर्या गॅस कंपनी कर्मचारी )हिने गॅस हाताळणी कशी करायची या बाबतीतली योग्य ती माहीती पिरकोन गावातील भारतीय जनता पक्षाचे उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांच्या निवासस्थानी नागरिकांना डेमो (प्रात्यक्षिके) देऊन माहीती दिली. गॅस हाताळत असताना ही माहीती प्रत्येक महीलेसाठी उपयुक्त आहे.
प्रत्येक गावोगावात अशा प्रकारे डेमो व्हायला पाहीजे तरच जनजागृती होईल.गॅसच्या बाबतीत जे स्फोट होतात त्याला अशा प्रकारचे डेमो घेऊन आळा बसेल.असे प्रतीक्षा म्हात्रे यांनी सांगितले.
गॅस स्फोटची कारणे व उपाययोजना यावेळी प्रतीक्षा म्हात्रे यांनी उपस्थितांना सांगितले.गॅस हाताळणी विषयी प्रत्यक्षिके व जनजागृती प्रत्येक घराघरात व्हायला पाहिजे आणि ती काळाची गरज असल्याचे भाजपा तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपसरपंच दिपाली पाटील,ग्रामपंचायत सदस्य संतोष गावंड,ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र गावंड,प्राध्यापक प्रमोद म्हात्रे,जेष्ठ कार्यकर्ते मंगेश गावंड,गणेश म्हात्रे,महेंद्र पाटील,वैभव गावंड.यूवा कार्यकर्ते चंद्रकांत गावंड,महेश गावंड व गणेश महीला मंडळ बचत गटाच्या अध्यक्ष लक्ष्मी गावंड,सचिव बिंदू गावंड,अलका गावंड,योगिता गावंड,शारदा गावंड,बेबी गावंड,अक्षता गावंड,दिव्या गावंड,हेमाक्षी गावंड,समिक्षा गावंड,दर्शिता गावंड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आमचे सर्व लेख आणि माहिती मिळण्यासाठी फॉलो करा: फेसबुक । इंस्टाग्राम । ट्विटर । टेलिग्राम । शेअरचाट

आता रायगडचे पर्यटन, विशेष बातम्या, दिनविशेष, आरोग्य यासंदर्भातील माहिती मिळण्यासाठी आमचे टेलिग्राम चॅनेल नक्की सबस्क्राइब करा. https://t.me/RaigadExplore
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: www.raigadexplore.in
पुढील लिंक क्लिक करून डेली अपडेट्ससाठी आमचा रायगड Explore व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता: Join What’s App Group